Active Passive Voice हा विषय आधी समजून घ्यावा, जेणेकरून Affirmative Imperative Sentence मधील Voice समजून घेणे अधिक सोपे होईल.
Affirmative Imperative Sentence मधील Voice – विषय सूची
- Affirmative Imperative Sentence मधील Voice
- Affirmative Imperative Sentence
- Imperative Sentence मधील Vocative
- Imperative Sentence मधील Adverb
- Passive Voice ची रचना करण्याचे नियम
- नियम १ - पहिले स्थान
- नियम २ - दुसरे स्थान
- नियम ३ - तिसरे स्थान
- नियम ४ - चौथे स्थान
- नियम ५ - पाचवे स्थान
- नियम ६ - सहावे स्थान
- Active to Passive Voice ची उदाहरणे
Affirmative Imperative Sentence मधील “Voice”
इंग्रजी व्याकरणामधील Active Voice (ऍक्टिव्ह वॉईस्) म्हणजे कर्तरी प्रयोग होय, तर Passive Voice (पॅसिव्ह वॉईस्) म्हणजे कर्मणी प्रयोग होय.
जेव्हा इंग्रजी वाक्याची सुरूवात एखाद्या To च्या Verb ने केलेली असते, त्या वाक्याला Active Voice चे Affirmative Sense (ऍफर्मेटीव सेन्स) चे Imperative Sentence (इम्परेटीव सेन्टेन्स) असे म्हणतात.
Affirmative Imperative Sentence
मराठीमध्ये Affirmative Sense (ऍफर्मेटीव सेन्स) याचा अर्थ होकारार्थी किंवा सकारात्मक असा आहे.
तसेच, Imperative Sentence (इम्परेटीव सेन्टेन्स) याचा अर्थ आज्ञार्थी वाक्य किंवा विनंतीवाचक वाक्य असा आहे.
त्यामुळे, Affirmative Imperative Sentence (ऍफर्मेटीव इम्परेटीव सेन्टेन्स) याचा अर्थ होकारार्थी / सकारात्मक आज्ञार्थी / विनंतीवाचक वाक्य असा आहे.
Imperative Sentence चा Subject
कोणत्याही Imperative Sentence मध्ये वाक्याचा Subject हा गृहीत धरलेला असतो.
अशा वाक्यामध्ये वाक्याचा Subject स्पष्टपणे (explicitly) लिहिण्याची आवश्यकता नसते.
Imperative Sentence मधील Vocative
कधीकधी To च्या Verb ने सुरू झालेल्या Imperative Sentence च्या अगोदर एखादे Noun हे संबोधन म्हणून वापरलेले असते.
संबोधन म्हणून वापरलेल्या Noun ला इंग्रजी व्याकरणामध्ये Vocative (व्होकेटीव) असे म्हणतात.
संबोधनाचे Noun हे त्या संबंधित Imperative Sentence चा भाग नसते, त्यामुळे संबोधन म्हणून वापरलेल्या Noun ला जोडून नेहमी comma (कॅामा) म्हणजे स्वल्पविराम हे विरामचिन्ह वापरलेले असते.
Imperative Sentence ओळखताना Vocative विचारात न घेता त्याच्यानंतर वापरलेले To चे Verb लक्षात घ्यावे लागते.
For example (उदाहरणार्थ),
- Boy, bring those books to me.
- ए मुला, ती पुस्तके माझ्याकडे घेऊन ये.
वरील वाक्यामध्ये bring (घेऊन येणे) या to च्या verb च्या आधी boy हे noun वापरलेले असून त्याला जोडून comma केलेला आहे.
या वाक्यामध्ये boy हे noun वाक्यातील Vocative आहे.
तसेच, वाक्याची सुरूवात to च्या verb ने केलेली असल्यामुळे या वाक्याला Imperative Sentence समजावे.
Imperative Sentence मधील Adverb
कधीकधी To च्या Verb ने सुरू झालेल्या Imperative Sentence च्या अगोदर Do, Please, Now, Then अशा प्रकारचे एखादे Adverb वापरलेले असते.
हे Adverb सुद्धा या Imperative Sentence चा भाग नसल्यामुळे ते विचारात न घेता त्याच्यानंतर वापरलेले To चे Verb लक्षात घ्यावे लागते.
For example (उदाहरणार्थ),
- Please ask your questions.
- कृपया आपले प्रश्न विचारा.
वरील वाक्यामध्ये ask (विचारणे) या to च्या verb च्या आधी Please हे adverb वापरलेले आहे.
Passive Voice ची रचना करण्याचे नियम
Affirmative Imperative Sentence मधील Active Voice च्या वाक्याचे Passive Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी पुढील नियम वापरावेत.
नियम १ (पहिले स्थान)
Imperative Sentence च्या अगोदर जर एखादे Vocative किंवा Adverb वापरलेले असेल, तर पहिल्या स्थानी ते लिहावे.
नियम २ (दुसरे स्थान)
दुसऱ्या स्थानी let लिहावे. वाक्यामध्ये जेव्हा एखादे Vocative किंवा Adverb वापरलेले नसते, तेव्हा Let चे पहिले अक्षर Capital मध्ये लिहावे.
नियम ३ (तिसरे स्थान)
तिसऱ्या स्थानी वाक्यातील वाक्यातील To च्या Verb चे Object आहे त्याच स्वरूपात लिहावे.
नियम ४ (चौथेे स्थान)
चौथ्या स्थानी be लिहावे.
नियम ५ (पाचवे स्थान)
पाचव्या स्थानी वाक्यातील To च्या Verb चे Past Participle लिहावे.
नियम ६ (सहावे स्थान)
सहाव्या स्थानी वाक्यातील उरलेले शब्द लिहावेत.