Intransitive Imperative Sentence मधील Voice समजणे सोपे होण्यासाठी पुढील विषय आधी समजून घ्यावेत –
Intransitive Imperative Sentence मधील Voice – विषय सूची
- Intransitive Imperative Sentence मधील Voice
- Affirmative Sense चे Intransitive Imperative Sentence
- Negative Sense चे Intransitive Imperative Sentence
- Passive Voice ची रचना करण्याचे नियम
- नियम १ - Affirmative Sense
- नियम २ - Negative Sense
- Active to Passive Voice ची उदाहरणे
Intransitive Imperative Sentence मधील “Voice”
इंग्रजी व्याकरणामधील Active Voice (ऍक्टिव्ह वॉईस्) म्हणजे कर्तरी प्रयोग होय, तर Passive Voice (पॅसिव्ह वॉईस्) म्हणजे कर्मणी प्रयोग होय.
जेव्हा इंग्रजी व्याकरणातील Imperative Sentence (इम्परेटीव सेन्टेन्स) मध्ये वापरलेले To चे Verb हे Intransitive (इन्ट्रांझिटिव्ह) म्हणजेच अकर्मक असते, त्या वाक्याला Active Voice चे Intransitive Imperative Sentence म्हणजेच अकर्मक आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात.
Intransitive असल्यामुळे अशा to च्या verb ला जोडून कधीही Object (कर्म) वापरले जात नाही.
मात्र, object नसूनही अशा Imperative Sentence चा Passive Voice करता येतो.
Affirmative Sense चे Intransitive Imperative Sentence
मराठीमध्ये Affirmative Sense (ऍफर्मेटीव सेन्स) याचा अर्थ होकारार्थी किंवा सकारात्मक असा आहे.
जेव्हा इंग्रजी वाक्याची सुरूवात एखाद्या Intransitive (अकर्मक) To च्या Verb ने केलेली असते, तेव्हा त्याला Affirmative Sense चे Intransitive Imperative Sentence असे म्हणतात.
For example (उदाहरणार्थ),
- Sit down.
- खाली बस.
वरील वाक्याची सुरूवात sit (बसणे) या intransitive to च्या verb ने केलेली आहे.
त्यामुळे या वाक्याला Affirmative Sense चे Intransitive Imperative Sentence समजावे.
Negative Sense चे Intransitive Imperative Sentence
मराठीमध्ये Negative Sense (निगेटिव सेन्स) याचा अर्थ नकारार्थी किंवा नकारात्मक असा आहे.
जेव्हा इंग्रजी वाक्याची सुरूवात Do not किंवा Don't यांपैकी एखाद्या शब्दसमूहाने केलेली असते आणि त्याला जोडून एखादे Intransitive (अकर्मक) To चे Verb वापरलेले असते, तेव्हा त्याला Negative Sense चे Intransitive Imperative Sentence असे म्हणतात.
For example (उदाहरणार्थ),
- Do not sit down.
- खाली बसू नकोस.
वरील वाक्याची सुरूवात Do not ने केलेली असून त्याला जोडून sit (बसणे) हे intransitive to चे verb वापरलेले आहे.
त्यामुळे या वाक्याला Negative Sense चे Intransitive Imperative Sentence समजावे.
Passive Voice ची रचना करण्याचे नियम
Intransitive Imperative Sentence मधील Active Voice च्या वाक्याचे Passive Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी पुढील नियम वापरावेत.
नियम १ (Affirmative Sense)
Intransitive to चे verb असलेले Imperative Sentence जर Affirmative Sense असेल, तर Passive Voice करण्यासाठी प्रथम You are asked to हे शब्द लिहून घ्यावेत.
या शब्दांना जोडून दिलेले Imperative Sentence जसेच्या तसे लिहावे. मात्र, लिहिताना त्याचे पहिले अक्षर Capital लिहू नये.
नियम २ (Negative Sense)
Intransitive to चे verb असलेले Imperative Sentence जर Negative Sense असेल, तर Passive Voice करण्यासाठी प्रथम You are not asked to हे शब्द लिहून घ्यावेत.
या शब्दांना जोडून दिलेले Imperative Sentence या वाक्यातील Do not किंवा Don't हे शब्द काढून टाकून जसेच्या तसे लिहावे.