नियम १
एखाद्याने एखादी गोष्ट करणे हे चांगले किंवा बरे, असा उपदेशात्मक अर्थ निर्माण करण्यासाठी had better (हॅड् बेटर) च्या रचनेचा उपयोग केला जातो.
नियम २
Had better च्या रचनेमध्ये जरी had वापरलेले असले, तरी ही रचना Past Perfect Tense ची समजू नये.
नियम ३
तसेच, जरी या रचनेमध्ये better वापरलेले असले, तरी ही रचना Comparative Degree ची सुद्धा समजू नये.
नियम ४
या रचनेमध्ये had better नंतर नेहमी Present Tense चे म्हणजेच पहिल्या रूपाचे To चे Verb वापरलेले असते, हे लक्षात ठेवावे.
For example (उदाहरणार्थ),
Ex. 1
- When you are among your friends, you had better avoid telling a lie.
- जेव्हा तू तुझ्या मित्रांमध्ये असतोस, तेव्हा तू खोटे बोलायचे टाळणे चांगले.
Ex. 2
- Students had better do their homework in time.
- विद्यार्थ्यांनी त्यांचा गृहपाठ वेळच्या वेळी करणे हे चांगले.
Ex. 3
- We had better work hard to make a living.
- उदरनिर्वाह करण्याकरिता आपण कष्ट करावे, हे बरे.
Ex. 4
- When you will go for an interview, you had better take all the testimonials along with you.
- जेव्हा तू मुलाखतीला जाशील, तेव्हा तू तुझ्यासोबत सर्व प्रशस्तीपत्रे न्यावीस, हे बरे.
Ex. 5
- You had better go home now.
- तू आता आपल्या घरी जावेस, हे बरे.
Ex. 6
- You had better wear a helmet while driving your motorbike.
- दुचाकी चालवताना तुम्ही हेल्मेट घालणे चांगले.