Auxiliary Verb in English Grammar
Auxiliary Verb (ऑक्झिलियरी व्हर्ब) चा मराठी अर्थ सहाय्यक क्रियापद असा आहे; कारण ते वाक्यात वापरलेल्या क्रियादर्शक Main Verb चा अर्थ पूर्ण करण्यासाठी त्याला सहाय्य करते.
इंग्रजी व्याकरणात Auxiliary Verbs ची विभागणी पुढीलप्रमाणे दोन प्रकारांमध्ये केलेली आहे.
Primary Auxiliary Verb
Primary Auxiliary Verb (प्रायमरी ऑक्झिलियरी व्हर्ब) म्हणजे मुख्य सहाय्यक क्रियापद होय.
Primary Auxiliary Verbs मध्ये be, shall, will, have, do या Auxiliary Verbs चा समावेश होतो.
सामान्यतः Primary Auxiliary Verbs चा उपयोग वाक्याचा काळ दर्शविण्यासाठी केला जातो.
Read more about Primary Auxiliary VerbsModal Auxiliary Verb
Modal Auxiliary Verb (मोडल ऑक्झिलियरी व्हर्ब) म्हणजे भावदर्शक सहाय्यक क्रियापद होय.
Modal Auxiliary Verbs मध्ये can, may, should, would, must, ought या Auxiliary Verbs चा समावेश होतो.
आपल्या मनातील भाव व्यक्त करण्यासाठी Modal Auxiliary Verbs सहाय्य करतात.
Read more about Modal Auxiliary Verbs