Infinitive – विषय सूची
- Infinitive म्हणजे काय?
- Main Verb किंवा Finite Verb
- Infinitive चे Object
- Infinitive चा Subject शी संबंध
- मराठी वाक्यातील Infinitive कसे ओळखावे?
- Infinitive चे प्रत्यय – चा / ची / चे / च्या आणि स / ला
- Infinitive चे प्रत्यय – साठी आणि करीता
- Infinitive चे वाक्यातील स्थान
Infinitive म्हणजे काय?
Infinitive (इन्फीनिटिव्ह) किंवा Infinite Verb (इन्फायनाईट व्हर्ब) म्हणजे क्रियापदाचे मूळरूप होय.
ज्या शब्दाने काही ना काही क्रिया सूचित होते, अशा शब्दाला To चे Verb असे म्हणतात.
जेव्हा असा क्रियादर्शक शब्द to सोबत लिहिला जातो, तेव्हा त्या क्रियादर्शक शब्दाला Infinitive किंवा Infinite Verb असे म्हणतात.
Main Verb किंवा Finite Verb
इंग्रजी वाक्याच्या दुसऱ्या स्थानी वापरले जाणारे To चे Verb हे नेहमी to काढून वापरले जाते आणि त्याला main verb किंवा finite verb असे म्हणतात.
To चे Verb हे त्याच्या मूळरूपात कधीही वापरले जात नाही. त्यामुळे त्याला Finite Verb (फायनाईट व्हर्ब) किंवा Main Verb (मेन व्हर्ब) असे म्हणतात.
Infinitive चे Object
Infinitive हा प्रत्यक्षात क्रियादर्शक शब्द असल्यामुळे ते transitive (ट्रान्झिटिव्ह) म्हणजे सकर्मक असू शकते.
Infinitive जर transitive असेल तर त्याला स्वतःचे Object असू शकते.
For example (उदाहरणार्थ),
- मला नवीन मोबाईल फोन विकत घेण्याची इच्छा आहे.
- I wish to buy a new mobile phone.
वरील वाक्यामध्ये wish (इच्छा असणे) हे To चे Verb वापरलेले असून त्याला जोडून to buy (विकत घेणे) हे Infinitive वापरलेले आहे.
तसेच, हे Infinitive सकर्मक असल्यामुळे त्याला जोडून a new mobile phone हे Object वापरलेले आहे.
या वाक्यामध्ये to buy a new mobile phone हा संपूर्ण शब्दसमूह एखाद्या Noun चे काम करत असल्यामुळे त्याला Noun Phrase असे म्हणतात.
Infinitive चा Subject शी संबंध
वाक्याच्या पहिल्या स्थानातील Subject हा वाक्याच्या दुसऱ्या स्थानातील finite verb ने सूचित होणारी क्रिया करत असतो. ही क्रिया करण्याचा Subject चा काही हेतू असतो.
Infinitive च्या रचनेने हा हेतू व्यक्त करता येतो.
For example (उदाहरणार्थ),
- नदीत पोहायचे असे सुरेशने ठरवले आहे.
- Suresh has decided to swim in the river.
वरील वाक्यामध्ये decide (ठरवणे) हे main verb वापरलेले असून त्याला जोडून to swim (पोहणे) हे Infinitive वापरलेले आहे.
या वाक्यामध्ये असे दिसते की वाक्यातील Subject चा (सुरेशचा) नदीत पोहण्याचा हेतू Infinitive च्या रचनेमुळे व्यक्त होत आहे.
मराठी वाक्यातील Infinitive कसे ओळखावे?
मराठी वाक्यातील ज्या क्रियापदाला चा / ची / चे / च्या किंवा स / ला किंवा साठी / करीता यांपैकी एखादा प्रत्यय लावलेला असतो, त्या क्रियापदाला infinitive असे म्हणतात.
For example (उदाहरणार्थ),
- मला या परीक्षेत नव्वद टक्के गुण मिळण्याची आशा आहे.
- I hope to get 90% marks in the examination.
वरील वाक्यामध्ये hope (आशा असणे) हे main verb वापरलेले असून त्याला जोडून to get (मिळणे) हे Infinitive वापरलेले आहे.
या वाक्यामध्ये असे दिसते की मराठी वाक्यातील मिळणे या क्रियापदाला ची हा प्रत्यय लावलेला आहे. त्यामुळे मिळण्याची या क्रियापदाला वाक्यातील Infinitive समजावे.
प्रत्यय – चा / ची / चे / च्या आणि स / ला
मराठी वाक्यातील ज्या क्रियापदाला चा / ची / चे / च्या किंवा स / ला यांपैकी एखादा प्रत्यय लावलेला असतो, त्याचे इंग्रजीमध्ये रूपांतर करताना ते नेहमी finite verb ला जोडून वापरलेले असते.
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- रविवारी भेटायचे असे आम्ही ठरवलेे.
- We decided to meet on Sunday.
Example 2
- हॉटेलमध्ये खायला मला आवडते.
- I like to eat in a hotel.
प्रत्यय – साठी आणि करीता
मराठी वाक्यातील ज्या क्रियापदाला साठी किंवा करीता यांपैकी एखादा प्रत्यय लावलेला असतो, त्याचे इंग्रजीमध्ये रूपांतर करताना ते नेहमी finite verb ला जोडून न वापरता त्यापासून दूर अंतरावर वापरलेले असते.
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- लोकांना सुरक्षितपणे चालण्यासाठी सरकारने पादचारी पूल बांधला आहे.
- Government has built the sky-walk for people to walk safely.
Example 2
- माझे शिक्षण यशस्वीपणे पूर्ण होण्याकरीता माझ्या वडिलांनी खूप मेहनत केली.
- My father worked hard for me to complete my education successfully.
Infinitive चे वाक्यातील स्थान
ज्याप्रमाणे finite verb ला वाक्यात दुसरे स्थान असते, त्याप्रमाणे infinitive ला मात्र वाक्यात निश्चित कोणतेही स्थान नसते.
Infinitive ची रचना करताना ते एकतर वाक्यातील finite verb ला जोडून वापरतात किंवा finite verb पासून दूर अंतरावर वापरतात.