must showing Determination


must चा वाक्यातील उपयोग



“must” showing Determination

Determination (डिटर्मिनेशन्) म्हणजे निश्चय हा भाव व्यक्त करण्यासाठी must चा उपयोग केला जातो.

म्हणजेच, जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला निश्चयपूर्वक करायची असते, तेव्हा ती व्यक्त करण्यासाठी must चा उपयोग केला जातो.

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • मी याबाबतीत माझ्या मनासारखे केलेच पाहिजे.
  • I must have my way in this matter.

एखाद्या बाबतीत निश्चय असल्याशिवाय आपल्याला कधीही मनासारखे करता येत नाही.

हा निश्चय दर्शविण्यासाठी वरील वाक्यामध्ये must चा उपयोग केला आहे.

Example 2
  • मी यावर्षी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी खूप अभ्यास केलाच पाहिजे.
  • I must study hard to pass the exam this year.

अभ्यास करण्याचा निश्चय केल्याशिवाय अभ्यास होत नाही आणि त्याशिवाय परीक्षेत उत्तीर्णसुद्धा होता येत नाही.

हा निश्चय दर्शविण्यासाठी वरील वाक्यामध्ये must चा उपयोग केला आहे.

Example 3
  • मी घरी जाण्यापूर्वी हे काम संपवलंच पाहिजे.
  • I must finish this work before I go home.

काम संपवून घरी जाण्याचा निश्चय वरील वाक्यातून व्यक्त होत आहे.

हा निश्चय दर्शविण्यासाठी वरील वाक्यामध्ये must चा उपयोग केला आहे.

This article has been first posted on and last updated on by