to creep
इंग्रजी व्याकरणामध्ये creep (क्रीप्) चा उपयोग To चे Verb म्हणून करण्यात येतो.
creep चा उपयोग To चे Verb म्हणून करताना ते पुढीलपैकी एका अर्थाने वापरलेले असते –
- सरपटणे, रांगणे, हातापायावर जाणे
- आवाज न करता नकळत जाणे
- नकळत हळू हळू येणे (वेळ, वार्धक्य इत्यादी)
- वाढून चढणे (वेली, रोपे इत्यादी)
- अंगावर कीटक सरपटत आहेत असा भास होणे
creep ची तीन रूपे
पहिले रूप | दुसरे रूप | तिसरे रूप |
---|---|---|
Present Tense (वर्तमानकाळ) |
Past Tense (भूतकाळ) |
Past Participle (भूतकालवाचक धातुसाधित) |
creep (क्रीप्) |
crept (क्रेप्ट) |
crept (क्रेप्ट) |
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- Grapevine has crept over the wall.
- द्राक्षांची वेल कुंपणावर वाढून चढली आहे.
Example 2
- My skin creeps when I see a snake.
- सापाला बघून माझ्या अंगावर काटा येतो. (अंगावर कीटक सरपटत आहेत असा भास होतो)
Example 3
- He crept out of the room without being seen.
- तो कोणालाही न दिसता आवाज न करता खोलीतून निघून गेला.
Example 4
- Many mistakes have crept into her game.
- तिच्या खेळामध्ये नकळतपणे अनेक चुका निर्माण झाल्या आहेत.
Example 5
- Doubts creep in when you are not winning.
- जेव्हा तुम्ही जिंकत नाही तेव्हा नकळतपणे मनामध्ये शंका निर्माण होतात.
Example 6
- The inflation rate has been creeping up since last year.
- गेल्या वर्षीपासून महागाईचा दर वाढत आहे.