Adjective of Quantity म्हणजे काय?
कोणत्याही Quantity (क्वान्टिटी) म्हणजेच परिमाण दर्शविणाऱ्या तयार होणाऱ्या Adjective ला Adjective of Quantity (ऍड्जेक्टिव्ह ऑफ क्वान्टिटी) म्हणजेच संख्यादर्शक विशेषण असे म्हणतात.
Adjective of Quantity चा उल्लेख करण्यासाठी Quantitative Adjective (क्वान्टिटेटिव्ह ऍड्जेक्टिव्ह) हि संज्ञासुद्धा वापरली जाते.
नियम १
Adjective of Quantity हे नेहमी संख्येत मोजता न येणाऱ्या म्हणजे Uncountable (अन्काऊंटेबल्) Noun ला जोडून वापरलेले असते.
हे Uncountable Noun एकतर Material Noun असते किंवा ते Abstract Noun असू शकते.
नियम २
एखाद्या भावनेची तीव्रता किंवा एखाद्या पदार्थाचे परिमाण यांचा उल्लेख करताना ते किती आहे, हे जेव्हा सांगायचे असते, तेव्हा Adjective of Quantity चा उपयोग केला जातो.
नियम ३
Adjective of Quantity मध्ये much, little, no, some, any, enough, sufficient, all, whole, half या प्रमुख Adjectives चा समावेश होतो.
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- There is some milk in the pot.
- पातेल्यात थोडं दूध आहे.
Example 2
- There is no water in the glass.
- पेल्यात काहीच पाणी नाहीये.
Example 3
- His speech did not have much influence on people.
- लोकांवर त्याच्या भाषणाचा जास्त प्रभाव पडला नाही.
Example 4
- He had enough fuel in his bike to travel for another hour.
- अजून एखादा तास प्रवास करण्यासाठी त्याच्या दुचाकीमध्ये पुरेसे इंधन होते.