Agent Noun


व्यवसायदर्शक नाम / कृतीदर्शक नाम



Agent Noun म्हणजे काय?

एखाद्या व्यक्तीचा व्यवसाय दर्शविण्यासाठी किंवा एखाद्या कृतीचा उल्लेख करण्यासाठी जे नाम वापरले जाते, त्याला Agent Noun (एजंट नाऊन) म्हणजेच व्यवसायदर्शक / कृतीदर्शक नाम असे म्हणतात.

नियम १

Agent Noun हे एखाद्या क्रियादर्शक To च्या Verb पासून तयार होते.

Agent Noun ज्या क्रियापदापासून बनते, त्या To च्या Verb ने दर्शविलेली क्रिया ते करत असते.

त्यामुळे त्याला Doer (डूअर) म्हणजेच क्रिया करणारा असेही म्हटले जाते.

नियम २

Agent Noun च्या शेवटी सामान्यतः er किंवा or यांपैकी एखादा प्रत्यय लावलेला असतो.

Verb
(क्रियापद)
Suffix
(प्रत्यय)
Agent Noun
(व्यवसायदर्शक नाम)
to teach
(शिकवणे)
er teacher
(शिक्षक)
to play
(खेळणे)
er player
(खेळाडू)
to dance
(नाचणे)
er dancer
(नर्तक / नर्तकी)
to employ
(नोकरीवर ठेवणे)
er employer
(नोकरीवर ठेवणारा मालक)
to write
(लिहिणे)
er writer
(लेखक)
to sing
(गाणे)
er singer
(गायक)
to bake
(भाजणे)
er baker
(पाव तयार करणारा)
to produce
(उत्पन्न करणे)
er producer
(उत्पादक)
to work
(काम करणे)
er worker
(कामगार)
to farm
(शेती करणे)
er farmer
(शेतकरी)
to weave
(विणणे)
er weaver
(कोष्टी)
to manage
(व्यवस्थापन करणे)
er manager
(व्यवस्थापक)
to print
(मुद्रण करणे)
er printer
(मुद्रक)
to paint
(रंगकाम करणे)
er painter
(रंगारी)
to prosecute
(खटला भरणे)
or prosecutor
(फिर्यादी)
to direct
(दिग्दर्शन करणे)
or director
(दिग्दर्शक)
to edit
(संपादन करणे)
or editor
(संपादक)
to translate
(भाषांतर करणे)
or translator
(भाषांतर करणारा)
to create
(निर्माण करणे)
or creator
(निर्माता)
to sail
(समुद्राची सफर करणे)
or sailor
(खलाशी)

This article has been first posted on and last updated on by