Nominative Case


प्रथमा विभक्ती



Nominative Case in English Grammar

Nominative Case (नॉमिनेटीव्ह केस) म्हणजे प्रथमा विभक्ती होय.

इंग्रजी व्याकरणामध्ये वाक्यातील Subject हा नेहमी Nominative Case चा समजला जातो.

म्हणजेच, वाक्यातील एखादे Noun किंवा Pronoun जेव्हा वाक्याचा Subject म्हणून वापरलेले असते, तेव्हा ते नेहमी Nominative Case चे समजावे.

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • आई बाजारातून भाज्या घेऊन आली.
  • Mother brought vegetables from the market.

वरील वाक्यामध्ये Mother हे Noun वाक्याचा Subject म्हणून वापरलेले असल्यामुळे ते Nominative Case चे समजावे.

Example 2
  • तो मला माझ्या अभ्यासात मदत करत आहे.
  • He is helping me in my studies.

वरील वाक्यामध्ये He हे Pronoun वाक्याचा Subject म्हणून वापरलेले असल्यामुळे ते Nominative Case चे समजावे.

Example 3
  • पोहायला शिकायचे असे सुरेशने ठरवले आहे.
  • Suresh has decided to learn swimming.

वरील वाक्यामध्ये Suresh हे Noun वाक्याचा Subject म्हणून वापरलेले असल्यामुळे ते Nominative Case चे समजावे.

Example 4
  • ते संध्याकाळी क्रिकेट खेळतात.
  • They play cricket in the evening.

वरील वाक्यामध्ये They हे Pronoun वाक्याचा Subject म्हणून वापरलेले असल्यामुळे ते Nominative Case चे समजावे.

Example 5
  • लोकांनी त्यांच्या राजाची स्तुती केली.
  • People praised their king.

वरील वाक्यामध्ये People हे Noun वाक्याचा Subject म्हणून वापरलेले असल्यामुळे ते Nominative Case चे समजावे.

This article has been first posted on and last updated on by