नियम १

ज्या Noun च्या शेवटी y हे अक्षर असते, त्याचे अनेकवचन करताना s किंवा ies यांपैकी एखादा प्रत्यय लावावा लागतो.

नियम २

अशा Noun चे अनेकवचन करताना y च्या अगोदर असलेले अक्षर हे vowel (वाउल) म्हणजे स्वर आहे कि consonant (कॉन्सनन्ट) म्हणजे व्यंजन आहे, हे लक्षात घ्यावे लागते.

इंग्रजीमध्ये a, e, i, o, u या अक्षरांना vowel असे म्हणतात, तर इतर उरलेल्या सर्व अक्षरांना consonant असे म्हणतात.

नियम ३

शेवटी y असणाऱ्या शब्दामध्ये y च्या अगोदर जर एखादे consonant वापरलेले असेल, तर त्या शब्दाचे अनेकवचन करताना y काढून त्या जागी ies हा प्रत्यय लावावा.

For example (उदाहरणार्थ),
Singular
(एकवचन)
Suffix
(प्रत्यय)
Plural
(अनेकवचन)
baby ies babies
lady ies ladies
country ies countries
variety ies varieties
sky ies skies
fly ies flies
body ies bodies
factory ies factories
city ies cities
spy ies spies
नियम ४

शेवटी y असणाऱ्या शब्दामध्ये y च्या अगोदर जर एखादे vowel म्हणजे a, e, i, o, u यांपैकी एखादे अक्षर वापरलेले असेल, तर त्या शब्दाचे अनेकवचन करताना y नंतर त्याला जोडून s हा प्रत्यय लावावा.

For example (उदाहरणार्थ),
Singular
(एकवचन)
Suffix
(प्रत्यय)
Plural
(अनेकवचन)
ray s rays
boy s boys
key s keys
donkey s donkeys
monkey s monkeys
toy s toys
journey s journeys
tray s trays

This article has been first posted on and last updated on by