“may” showing Possibility
Possibility (पॉसिबिलिटि) म्हणजे शक्यता हा भाव व्यक्त करण्यासाठी may चा उपयोग केला जातो.
अशा वाक्याची रचना अर्थ न बदलता आणि may चा उपयोग न करता It is possible that (इट इज पॉसिबल् दॅट) अशी सुद्धा करता येते.
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- आज पाऊस पडण्याची शक्यता आहे.
- It may rain.
- It is possible that it will rain.
Example 2
- हे खरे असण्याची शक्यता आहे.
- It may be true.
- It is possible that it will be true.
Example 3
- तो घरी असण्याची शक्यता आहे.
- He may be at home.
- It is possible that he will be at home.
Example 4
- तिने काळजी घेतली तर ती बरी होण्याची शक्यता आहे.
- She may recover if she is careful.
- It is possible that she will recover if she is careful.