may - Wish


may चा वाक्यातील उपयोग - सदिच्छा



“may” showing Wish

Wish (विश) म्हणजे सदिच्छा हा भाव व्यक्त करण्यासाठी may चा उपयोग केला जातो.

अशा वाक्याची रचना एखाद्या Verbal Question (व्हर्बल क्वेश्चन) म्हणजे प्रश्नासारखी वाटते. प्रत्यक्षात ही रचना प्रश्नार्थक नसून सदिच्छा व्यक्त करण्यासाठी असलेली एक वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे.

त्यामुळे, ही रचना केल्यावर त्या वाक्याच्या शेवटी न विसरता उद्गारचिन्ह ( ! ) करण्याची पद्धत आहे.

अशा वाक्याची रचना अर्थ न बदलता आणि may चा उपयोग न करता I wish (आय विश) अशी सुद्धा करता येते.

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • तुम्ही अनेक वर्षे आनंदाने जगावे ही सदिच्छा.
  • May you live happily and long!
  • I wish you will live happily and long.
Example 2
  • तुम्ही सुखरूप परत यावे ही सदिच्छा.
  • May you return safely!
  • I wish you will return safely.
Example 3
  • माझे आशीर्वाद तुमच्या सोबत असावेत ही सदिच्छा.
  • May my blessings go with you!
  • I wish my blessings will go with you.
Example 4
  • यश तुमच्या सोबत असावे ही सदिच्छा.
  • May success be with you!
  • I wish success will be with you.

This article has been first posted on and last updated on by