“must” showing Duty
Certainty (सर्टन्टी) म्हणजे खात्री किंवा Inevitability (इनेव्हिटिबिलिटी) म्हणजे अनिवार्यता हा भाव व्यक्त करण्यासाठी must चा उपयोग केला जातो.
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- कुणीतरी त्याला हे सांगितले असले पाहिजे.
- Somebody must have told this to him.
वरील वाक्यात "कुणीतरी त्याला हे सांगितले" याबद्दल संपूर्ण खात्री आहे, आणि त्यामुळे ती व्यक्त करण्यासाठी must चा उपयोग केलेला आहे.
ही खात्री दर्शविण्यासाठी वरील वाक्यामध्ये must चा उपयोग केला आहे.
Example 2
- काकांना वृद्धत्वाच्या वेदनांची जाणीव नक्कीच होत असेल.
- Uncle must be feeling the pangs of old age.
वृद्धपणात वृद्धत्वाची जाणीव होणे हे अनिवार्य असते.
ही अनिवार्यता दर्शविण्यासाठी वरील वाक्यामध्ये must चा उपयोग केला आहे.
Example 3
- त्याला त्या घटनेचं वाईट नक्कीच वाटत असेल.
- He must be feeling very bad about the incident.
वरील वाक्यात "त्याला वाईट वाटत असेल" याबद्दल संपूर्ण खात्री आहे
ही खात्री दर्शविण्यासाठी वरील वाक्यामध्ये must चा उपयोग केला आहे.