“must” showing Necessity and Obligation
Necessity (नेसेसिटी) म्हणजे गरज किंवा Obligation (ऑब्लिगेशन्) म्हणजे बंधन किंवा कर्तव्य यांपैकी एक भाव व्यक्त करण्यासाठी must चा उपयोग केला जातो.
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- आपण कायद्याचे पालन केलेच पाहिजे.
- We must obey the law.
कायद्याचे पालन ही एक सामाजिक गरज आहे. तसेच समाजातील प्रत्येक व्यक्तीला कायद्याचे बंधन असते.
हे नैतिक बंधन दर्शविण्यासाठी वरील वाक्यामध्ये must चा उपयोग केला आहे.
Example 2
- एखाद्याने काम केलेच पाहिजे नाहीतर उपाशी राहिले पाहिजे.
- One must work or starve.
वरील वाक्यातून गरज आणि बंधन अशा दोन्हीही भाव व्यक्त होतात.
प्रत्येकाला उपजीविका करण्यासाठी काम करणे गरजेचे असते किंवा बंधनकारक असते. काम न केल्यास उपजीविका होणार नाही आणि उपासमार घडेल, हे या वाक्यातून सूचित होते.
गरज आणि बंधन दर्शविण्यासाठी वरील वाक्यामध्ये must चा उपयोग केला आहे.
Example 3
- विद्यार्थ्यांनी वाचनालयात शांतता राखलीच पाहिजे.
- Students must maintain silence in the library.
वाचनालयामध्ये बसण्यासाठी विद्यार्थांनी शांत राहणे हे त्यांच्याकडून अपेक्षित आहे आणि त्यांच्यावर ते बंधनकारक सुद्धा आहे.
हे बंधन दर्शविण्यासाठी वरील वाक्यामध्ये must चा उपयोग केला आहे.