could have


could have चा वाक्यातील उपयोग



Past Modal Verb “could have”

एखादी गोष्ट आपण वेळेवर न केल्यामुळे ती गोष्ट राहून जाते. मात्र, अशी राहून गेलेली गोष्ट करण्याची आपली शारीरिक आणि मानसिक क्षमता असते असे आपल्या लक्षात येते.

वेळ निघून गेल्यानंतर ही गोष्ट आपण करू शकलो असतो, ती करण्याची आपली बौध्दिक आणि शारीरिक क्षमता होती, असे जेव्हा सुचवायचे असते, तेव्हा could have (कुड हॅव्) चा उपयोग केला जातो.

could have ची रचना

could have च्या रचनेमध्ये could have ला जोडून नेहमी एखाद्या Past Participle चा उपयोग केला जातो.

could have च्या रचनेचे नकारार्थी स्वरूप  could not have असे करावे लागते.

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • मी माझ्या आयुष्यात पंतप्रधान होऊ शकलो असतो; पण मला पंतप्रधान होण्याची इच्छा नव्हती.
  • In my lifetime I could have become a prime minister but I had no desire to become one.
Example 2
  • मी १० वर्षांपूर्वी मुंबईमध्ये घर घेऊ शकलो असतो; पण मला पुण्याला राहायचे होते.
  • I could have bought a house in Mumbai 10 years ago, but I wanted to stay in Pune.
Example 3
  • तो भारतीय सैन्यात भरती होऊ शकला असता.
  • He could have joined the Indian Army.

This article has been first posted on and last updated on by