bring
इंग्रजी व्याकरणामध्ये bring (ब्रिंग) चा उपयोग To चे Verb म्हणून करण्यात येतो.
bring चा उपयोग To चे Verb म्हणून करताना ते पुढीलपैकी एका अर्थाने वापरलेले असते –
- आणणे
- घेऊन येणे
- घडवून आणणे
bring ची तीन रूपे
पहिले रूप | दुसरे रूप | तिसरे रूप |
---|---|---|
Present Tense (वर्तमानकाळ) |
Past Tense (भूतकाळ) |
Past Participle (भूतकालवाचक धातुसाधित) |
bring (ब्रिंग) |
brought (ब्रॉट) |
brought (ब्रॉट) |
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- Mother brought vegetables from the market.
- आई बाजारातून भाज्या घेऊन आली.
Example 2
- His life story brought tears to my eyes.
- त्याच्या जीवनगाथेने माझ्या डोळ्यांत अश्रू आणले.
- त्याची जीवनगाथा ऐकून माझ्या डोळ्यांत अश्रू आले.
Example 3
- War always brings misery.
- युद्ध नेहमी दुःखच आणते.
- युद्धामुळे नेहमी दुःखच मिळते.
Example 4
- Rajesh brings books from the library every month.
- राजेश दरमहा वाचनालयातून पुस्तके घेऊन येतो.
Example 5
- She had brought a gift for her mother.
- ती तिच्या आईसाठी भेटवस्तू घेऊन आली होती.