Active Passive Voice आणि Simple Future Tense चा Active Voice हे विषय आधी समजून घ्यावेत, जेणेकरून Simple Future Tense चा Passive Voice समजून घेणे अधिक सोपे होईल.
Simple Future Tense मधील Passive Voice – विषय सूची
- Simple Future Tense मधील Passive Voice
- Passive Voice ची रचना
- Passive Voice च्या वाक्यातील Doer
- Doer विषयी विशेष टीप
- Active Voice ची रचना करण्याचे नियम
- नियम १ - पहिले स्थान
- नियम २ - दुसरे स्थान
- नियम ३ - तिसरे स्थान
- नियम ४ - चौथे स्थान
- Passive to Active Voice ची उदाहरणे
Simple Future Tense चा “Passive Voice”
इंग्रजी व्याकरणामधील Passive Voice (पॅसिव्ह वॉईस्) म्हणजे कर्मणी प्रयोग होय.
ज्या वाक्यात shall be किंवा will be यांपैकी एखादे To be चे Verb वापरलेले असते आणि त्याच्यासोबत त्याला जोडून एखादे Past Participle वापरलेले असते, त्या वाक्याला Passive Voice चे Simple Future Tense चे वाक्य असे म्हणतात.
Passive Voice ची रचना
इंग्रजी वाक्याच्या तिसऱ्या स्थानी वापरलेल्या Object ला कधीही दुसऱ्या स्थानी वापरलेल्या Verb ने सूचित होणारी क्रिया करता येत नाही.
मात्र, जेव्हा इंग्रजी वाक्यातील Object वाक्याच्या पहिल्या स्थानी वापरलेले असते आणि अशा वाक्याचा Subject हा वाक्याच्या तिसऱ्या स्थानी वापरलेला असतो, तेव्हा त्या वाक्याला Passive Voice चे म्हणजेच कर्मणी प्रयोगाचे वाक्य असे म्हणतात.
जेव्हा Simple Future Tense मधील Passive Voice च्या वाक्याचे रूपांतर Active Voice मध्ये करावयाचे असते, तेव्हा त्या वाक्याचे पुढील घटक लक्षात घ्यावे लागतात.
Passive Voice च्या वाक्यातील doer
Passive Voice च्या रचनेमध्ये वाक्याच्या शेवटी सामान्यतः by हे Preposition आणि त्याला जोडून एखादे Noun किंवा Accusative Case चे Pronoun वापरलेले असते.
Passive Voice च्या वाक्यातील by + Noun / Pronoun या शब्दसमूहाला doer (डूअर) असे म्हणतात.
For example (उदाहरणार्थ),
- Cricket will be played regularly by them.
- त्यांच्याकडून नियमितपणे क्रिकेट खेळले जाईल.
वरील वाक्यामध्ये will be या to be च्या verb ला जोडून played हे Past Participle (तिसरे रूप) वापरलेले आहे.
वाक्याच्या पहिल्या स्थानी Cricket हे Common Noun वापरलेले आहे.
तसेच, वाक्याच्या शेवटी by या Preposition ला जोडून them हे Accusative Case चे Pronoun वापरलेले आहे.
वाक्याचा Subject वाक्यातील क्रिया करण्यामध्ये Passive म्हणजे निष्क्रिय असल्यामुळे हे वाक्य Passive Voice चे म्हणजे कर्मणी प्रयोगाचे समजावे.
Doer विषयी विशेष टीप
Passive Voice च्या वाक्याचे रूपांतर Active Voice मध्ये करण्यासाठी वाक्यातील doer ची आवश्यकता असते. मात्र, कधीकधी वाक्यात doer वापरलेला असतो आणि कधीकधी doer वापरलेला नसतो.
जेव्हा वाक्यामध्ये doer वापरलेला नसतो, त्यावेळी वाक्याचा अर्थ लक्षात घेऊन योग्य तो doer गृहीत धरावा लागतो.
Active Voice ची रचना करण्याचे नियम
Simple Future Tense मधील Passive Voice च्या वाक्याचे Active Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी पुढील नियम वापरावेत.
नियम १ (पहिले स्थान)
पहिल्या स्थानी वाक्यातील doer लिहावा. मात्र, by लिहून नये.
Doer म्हणून जर एखादे Noun वापरलेले असेल, तर ते आहे तसेच लिहावे.
परंतु, doer म्हणून जर Accusative Case चे Pronoun वापरलेले असेल, तर त्याचे रूपांतर Nominative Case च्या Pronoun मध्ये पुढीलप्रमाणे करावे.
Accusative Case चे Pronoun | Nominative Case चे Pronoun |
---|---|
me | I |
us | We |
you | You |
him | He |
her | She |
it | It |
them | They |
नियम २ (दुसरे स्थान)
दुसऱ्या स्थानी will लिहावे आणि त्याला जोडून वाक्यातील Past Participle चे Present Tense (पहिले रूप) लिहावे.
तसेच, वाक्यातील will be किंवा shall be यांपैकी वापरलेले to be चे verb काढून टाकावे.
नियम ३ (तिसरे स्थान)
तिसऱ्या स्थानी Passive Voice च्या वाक्यातील Subject लिहावा.
Subject म्हणून जर एखादे Noun वापरलेले असेल, तर ते आहे तसेच लिहावे.
परंतु, Subject म्हणून जर Nominative Case चे Pronoun वापरलेले असेल, तर त्याचे रूपांतर Accusative Case च्या Pronoun मध्ये पुढीलप्रमाणे करावे.
Nominative Case चे Pronoun | Accusative Case चे Pronoun |
---|---|
I | me |
We | us |
You | you |
He | him |
She | her |
It | it |
They | them |
नियम ४ (चौथेे स्थान)
चौथ्या स्थानी वाक्यातील उरलेले शब्द लिहावेत. मात्र, will be, shall be आणि by लिहू नयेत.
For example (उदाहरणार्थ),
Example 1
वरील Passive Voice च्या वाक्यामध्ये will be या to be च्या verb ला जोडून planted हे Past Participle (तिसरे रूप) वापरलेले आहे.
या वाक्यामध्ये doer वापरलेला नसल्यामुळे Active Voice ची रचना करताना वाक्याचा अर्थ लक्षात घेऊन people हा doer गृहीत धरलेला आहे.
वाक्याचा Subject वाक्यातील क्रिया करण्यामध्ये Passive म्हणजे निष्क्रिय असल्यामुळे हे वाक्य Passive Voice चे म्हणजे कर्मणी प्रयोगाचे समजावे.
या वाक्याचे Active Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी वर दिलेल्या नियमांचा उपयोग करण्यात येतो.
Example 3
वरील Passive Voice च्या वाक्यामध्ये will be या to be च्या verb ला जोडून completed हे Past Participle (तिसरे रूप) वापरलेले आहे.
तसेच, वाक्याच्या शेवटी by या Preposition ला जोडून Kedar हे या Proper Noun वापरलेले आहे.
वाक्याचा Subject वाक्यातील क्रिया करण्यामध्ये Passive म्हणजे निष्क्रिय असल्यामुळे हे वाक्य Passive Voice चे म्हणजे कर्मणी प्रयोगाचे समजावे.
या वाक्याचे Active Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी वर दिलेल्या नियमांचा उपयोग करण्यात येतो.