नियम १
एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट करावीशी वाटते, असा अर्थ निर्माण करण्यासाठी feel like या रचनेचा उपयोग केला जातो.
नियम २
या रचनेमध्ये feel हे To चे Verb वाक्याचे main verb म्हणून वापरलेले असते आणि त्याला जोडून like हे Preposition वापरलेले असते.
नियम ३
तसेच, like या Preposition ला जोडून ing प्रत्यय लावलेले Gerund वापरलेले असते.
Gerund हे प्रत्यक्षात To चे Verb असल्यामुळे ते Transitive (सकर्मक) किंवा Intransitive (अकर्मक) असू शकते.
Transitive (सकर्मक) असल्यास त्याला स्वतःचे Object आणि Extension असू शकते.
Examples (उदाहरणार्थ)
Ex. 1
- कधीकधी मला देशाचा पंतप्रधान व्हावेसे वाटते.
- Sometimes I feel like becoming a prime minister.
Ex. 2
- बहुसंख्य विद्यार्थ्यांना अभ्यास न करता परीक्षेत उत्तीर्ण व्हावेसे वाटते.
- Most of the students feel like passing in the examination without studying hard.
Ex. 3
- आज मला शाळेत जावेसे वाटत नाही.
- I do not feel like going to school today.
Ex. 4
- मीनाला चिमणीसारखे हवेत उडावेसे वाटते.
- Meena feels like flying in the air like a sparrow.