Preposition म्हणजे काय?

Preposition (प्रेपोझिशन) म्हणजे शब्दयोगी अव्यय होय.

वाक्यातील एखाद्या Noun किंवा Pronoun चा त्याच वाक्यातील दुसऱ्या एखाद्या Noun किंवा Pronoun शी असलेला संबंध दर्शविण्यासाठी Preposition चा उपयोग केला जातो.

For example (उदाहरणार्थ),
  • मी ते पेन टेबलावर ठेवलेले आहे.
  • I have kept the pen on the table.

वरील वाक्यामध्ये pen आणि table या दोन Nouns चा एकमेकांशी असलेला संबंध on या Preposition म्हणजेच शब्दयोगी अव्ययाने व्यक्त होत आहे.

Prepositions ची विभागणी पुढीलप्रमाणे दोन भागांमध्ये केलेली आहे.

Simple Preposition

Simple Preposition (सिम्पल प्रेपोझिशन) म्हणजे साधे शब्दयोगी अव्यय होय.

Simple Preposition हे केवळ एकाच शब्दापासून तयार झालेले असते.

List of Simple Prepositions
Preposition
(शब्दयोगी अव्यय)
Marathi Meaning
(मराठी अर्थ)
at कडे(गतीची दिशा), वाजता(वेळ), वर/पाशी(जागा), कार्यात, स्थितीत, दराने
by जवळ/शेजारी, शेजारून/वरून (गतिवाचक), वेळी (कालावधी), ..ने (वाहनाने)
for साठी, करीता, बद्दल, ऐवजी
from पासून, कडून, वरून, आतून
in आत, मध्ये, ..चा भाग(अंश), अवधीच्या आत(वेळ), एखाद्या परिस्थितीत
like प्रमाणे, सारखा, सारखी, सारखे, सारख्या
near जवळ, पाशी, बाजूला, शेजारी
of ..चा (Possession - मालकी दर्शक)
off पासून दूर, पासून अलग, बाजूला
on वर, दिवशी, नंतर, विषयी, बाजूला, साधनाने
over वर, वरून पलीकडे, ..करताना, ..मुळे
through मधून, आतून, च्या शेवटपर्यंत
till पर्यंत (कालवाचक)
to कडे, पर्यंत, अप्रत्यक्ष कर्म दर्शविण्यासाठी
up वर (उर्ध्वगामी गतिवाचक)
with सह, बरोबर, शेजारी, जवळ, ..ने ("सहाय्या"ने या अर्थाने)

Compound Preposition

Compound Preposition (कम्पाउंड प्रेपोझिशन) म्हणजे संयुक्त शब्दयोगी अव्यय होय.

Compound Preposition हे दोन किंवा अधिक शब्द एकमेकांना जोडून तयार झालेले असते.

List of Compound Prepositions
Preposition
(शब्दयोगी अव्यय)
Marathi Meaning
(मराठी अर्थ)
about विषयी, संबंधी, बद्दल, सभोवती, सुमारे
above वर, वरच्या बाजूला, पलीकडे, पेक्षा अधिक, कक्षेच्या बाहेर असलेला
across पलीकडे, एका बाजूने दुसऱ्या बाजूला
after नंतर, मागे, मागोमाग, पाठीमागे
against विरुद्ध, वर, टेकून, पार्श्वभूमीवर
along बाजूने, कडेने, बाजूला, कडेला, शेजारी
among मध्ये ("अनेकांमध्ये" या अर्थाने)
around सभोवती, आसपास, आजूबाजूला, सुमारे
before पूर्वी, अगोदर, समोर, वरच्या दर्जाचा
behind मागे, पाठीमागे, आड, कारणीभूत
below खाली
beneath खाली, ..पेक्षा खालच्या दर्जाने
beside शेजारी, जवळ, बाजूला, तुलना केल्यास
between मध्ये ("दोहोंमध्ये" या अर्थाने)
beyond च्या पलीकडे, आवाक्याबाहेर
except खेरीज, शिवाय, व्यतिरिक्त, सोडल्यास
inside आत, आतील बाजूस
into आतमध्ये ("बाहेरून" आत या अर्थाने)
outside बाहेर, बाहेरील बाजूस
toward कडे, ..च्या दिशेने, संबंधी, ..च्या हेतूने, जवळ
under खाली, पेक्षा कमी, एखाद्या परिस्थितीत
upon वर
within आत, आतील बाजूस, एखाद्या मर्यादेच्या आत
without खेरीज, शिवाय

This article has been first posted on and last updated on by