Let च्या Imperative Sentence मधील Voice समजणे सोपे होण्यासाठी पुढील विषय आधी समजून घ्यावेत –
Let च्या Imperative Sentence मधील Voice – विषय सूची
- Let च्या Imperative Sentence मधील Voice
- Let च्या Imperative Sentence ची रचना
- Passive Voice ची रचना करण्याचे नियम
- नियम १ - पहिले स्थान
- नियम २ - दुसरे स्थान
- नियम ३ - तिसरे स्थान
- नियम ४ - चौथे स्थान
- नियम ५ - पाचवे स्थान
- नियम ६ - सहावे स्थान
- नियम ७ - सातवे स्थान
- Active to Passive Voice ची उदाहरणे
Let च्या Imperative Sentence मधील “Voice”
इंग्रजी व्याकरणामधील Active Voice (ऍक्टिव्ह वॉईस्) म्हणजे कर्तरी प्रयोग होय, तर Passive Voice (पॅसिव्ह वॉईस्) म्हणजे कर्मणी प्रयोग होय.
जेव्हा इंग्रजी वाक्याची सुरूवात Let (लेट्) ने केलेली असते, तेव्हा अशा वाक्यालासुद्धा Imperative Sentence (इम्परेटीव सेन्टेन्स) असे म्हणतात.
Let च्या Imperative Sentence ची रचना
जेव्हा Let च्या Active Voice मधील वाक्याचे रूपांतर Passive Voice मध्ये करावयाचे असते, तेव्हा त्या वाक्याचे पुढील घटक लक्षात घ्यावे लागतात.
Passive Voice ची रचना करण्याचे नियम
Let च्या Imperative Sentence मधील Active Voice च्या वाक्याचे Passive Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी पुढील नियम वापरावेत.
नियम १ (पहिले स्थान)
पहिल्या स्थानी Let लिहावे.
नियम २ (दुसरे स्थान)
दुसऱ्या स्थानी वाक्यातील Object आहे त्याच स्वरूपात लिहावे.
नियम ३ (तिसरे स्थान)
तिसऱ्या स्थानी be लिहावे.
नियम ४ (चौथे स्थान)
चौथ्या स्थानी वाक्यातील To च्या Verb चे Past Participle म्हणजे तिसरे रूप लिहावे.
नियम ५ (पाचवे स्थान)
पाचव्या स्थानी वाक्यातील उरलेले शब्द लिहावेत.
नियम ६ (सहावे स्थान)
सहाव्या स्थानी by हे Preposition लिहावे.
नियम ७ (सातवे स्थान)
सातव्या स्थानी Let नंतरचे Accusative Case चे Noun किंवा Pronoun आहे त्याच स्वरूपात लिहावे.