Analysis of Complex Sentence – विषय सूची
- इंग्रजी व्याकरणातील ‘Noun Clause as Object of Verb’
- ‘Main Clause’ आणि ‘Subordinating Clause’
- ‘Noun Clause as Object of Verb’ ची रचना
- Noun Clause मधील Indirect Object
- ‘Noun Clause as Object of Verb’ ची उदाहरणे
Analysis of Complex Sentence आणि Noun Clause हे विषय आधी समजून घ्यावेत, जेणेकरून Noun Clause as Object of Verb समजून घेणे अधिक सोपे होईल.
Noun Clause as Object of Verb
इंग्रजी व्याकरणातील Complex Sentence (कॉम्प्लेक्स सेन्टेन्स) मध्ये जे गौणवाक्य noun म्हणून वापरलेले असते, त्याला Noun Clause (नाऊन क्लॉज्) म्हणजेच नामवाचक गौणवाक्य असे म्हणतात.
अशा Noun Clause चा उपयोग वाक्यामध्ये जेव्हा एखाद्या transitive to च्या verb चे object म्हणून केलेला असतो, तेव्हा त्या Noun Clause ला Noun Clause as Object of Verb (नाऊन क्लॉज् ऍज् ऑब्जेक्ट ऑफ व्हर्ब) म्हणजेच नामवाचक गौणवाक्य (क्रियादर्शक क्रियापदाचे कर्म) असे म्हणतात.
‘Main Clause’ आणि ‘Subordinating Clause’
Complex Sentence मधील दोन वेगवेगळी वाक्ये एकत्र जोडण्यासाठी एखाद्या Subordinating Conjunction चा उपयोग केलेला असतो.
अशा वाक्यातील Subordinating Conjunction ने सुरू होणाऱ्या वाक्याला गौणवाक्य असे म्हणतात, तर दुसऱ्या वाक्याला मुख्यवाक्य असे म्हणतात.
गौणवाक्याला इंग्रजी व्याकरणामध्ये Subordinating Clause (सबॉर्डिनेटिंग् क्लॉज्) असे म्हणतात.
तसेच, मुख्यवाक्याला इंग्रजी व्याकरणामध्ये Main Clause (मेन क्लॉज्) किंवा Principal Clause (प्रिन्सिपल क्लॉज्) असे म्हणतात.
Noun Clause as Object of Verb ची रचना
Noun Clause as Object of Verb ची रचना नेहमी एखाद्या Complex Sentence मध्ये वापरलेली असते.
या रचनेमध्ये Main Clause मधील to चे verb हे नेहमी transitive (ट्रांझिटिव्ह) म्हणजेच सकर्मक असते. तसेच, वाक्यातील Subordinating Clause हा त्या transitive verb ला जोडलेला असतो.
अशा वाक्यामध्ये Main Clause मधील to चे verb हे transitive असल्यामुळे या वाक्यातील Subordinating Clause ला Noun Clause समजावे.
तसेच, या संपूर्ण Noun Clause ला वाक्यातील Main Clause मधील transitive verb चे object समजावे.
For example (उदाहरणार्थ),
- She doesn't know when he will return.
- तो कधी परतेल हे तिला माहित नाही.
वरील वाक्यामध्ये ‘She doesn't know’ आणि ‘he will return’ या दोन वाक्यांना जोडण्यासाठी when (व्हेन) हे Subordinating Conjunction वापरलेले आहे. त्यामुळे, या संपूर्ण जोडवाक्याला Complex Sentence म्हणजेच मिश्र वाक्य समजावे.
तसेच, ‘when he will return’ हा संपूर्ण शब्दसमूह know या transitive to च्या verb चे object म्हणून वापरलेला आहे.
त्यामुळे, या Subordinating Clause ला Noun Clause as Object of Verb असे म्हणतात.
या वाक्याचे पृथक्करण पुढीलप्रमाणे करता येते –
-
Main Clause She doesn't know
-
Subordinating Clause when he will return
- Noun Clause as Object of Verb ‘know’ in the Main Clause
Noun Clause मधील Indirect Object
कधीकधी Main Clause मधील Transitive Verb आणि Noun Clause मधील Subordinating Conjunction यांच्या मध्ये एखादे Common Noun अथवा Proper Noun किंवा Accusative Case चे Pronoun हे Indirect Object (इन्डायरेक्ट ऑब्जेक्ट) म्हणजेच अप्रत्यक्ष कर्म म्हणून वापरलेले असते.
अशा वाक्यामध्ये Noun Clause चा संबंध Indirect Object शी न जोडता Transitive Verb शी जोडावा लागतो हे लक्षात ठेवावे.
For example (उदाहरणार्थ),
- He asked me where I live.
- त्याने मला विचारले की मी कुठे राहतो.
वरील वाक्यामध्ये ‘He asked me’ आणि ‘I live’ या दोन वाक्यांना जोडण्यासाठी where (व्हेअर) हे Subordinating Conjunction वापरलेले आहे. त्यामुळे, या संपूर्ण जोडवाक्याला Complex Sentence समजावे.
या Complex Sentence मध्ये Indirect Object म्हणून me हे pronoun वापरलेले आहे, तर Direct Object म्हणून ‘where I live’ हा संपूर्ण शब्दसमूह वापरलेला आहे.
या वाक्याचे पृथक्करण पुढीलप्रमाणे करता येते –
-
Main Clause He asked me
-
Subordinating Clause where I live
- Noun Clause as Object of Verb ‘asked’ in the Main Clause
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- He says that he won't go.
-
Main Clause He says
-
Subordinating Clause that he won't go
- Noun Clause as Object of Verb ‘says’ in the Main Clause
Example 2
- I cannot tell what has become of him.
-
Main Clause I cannot tell
-
Subordinating Clause what has become of him
- Noun Clause as Object of Verb ‘tell’ in the Main Clause
Example 3
- She asked the boy how old he was.
-
Main Clause She asked the boy
-
Subordinating Clause how old he was
- Noun Clause as Object of Verb ‘asked’ in the Main Clause
Example 4
- No one knows who he is.
-
Main Clause No one knows
-
Subordinating Clause who he is
- Noun Clause as Object of Verb ‘knows’ in the Main Clause
Example 5
- They asked me whether my father was at home.
-
Main Clause They asked me
-
Subordinating Clause whether my father was at home
- Noun Clause as Object of Verb ‘asked’ in the Main Clause