Analysis of Complex Sentence – विषय सूची
- इंग्रजी व्याकरणातील ‘Noun Clause as Subject of Verb’
- ‘Main Clause’ आणि ‘Subordinating Clause’
- ‘Noun Clause as Subject of Verb’ ची रचना
- ‘Noun Clause as Subject of Verb’ कसा ओळखावा?
- ‘Noun Clause as Subject of Verb’ ची उदाहरणे
Analysis of Complex Sentence आणि Noun Clause हे विषय आधी समजून घ्यावेत, जेणेकरून Noun Clause as Subject of Verb समजून घेणे अधिक सोपे होईल.
Noun Clause as Subject of Verb
इंग्रजी व्याकरणातील Complex Sentence (कॉम्प्लेक्स सेन्टेन्स) मध्ये जे गौणवाक्य noun म्हणून वापरलेले असते, त्याला Noun Clause (नाऊन क्लॉज्) म्हणजेच नामवाचक गौणवाक्य असे म्हणतात.
अशा Noun Clause चा उपयोग वाक्यामध्ये जेव्हा subject म्हणून केलेला असतो, तेव्हा त्या Noun Clause ला Noun Clause as Subject of Verb (नाऊन क्लॉज् ऍज् सब्जेक्ट ऑफ व्हर्ब) म्हणजेच नामवाचक गौणवाक्य (क्रियापदाचा कर्ता) असे म्हणतात.
‘Main Clause’ आणि ‘Subordinating Clause’
Complex Sentence मधील दोन वेगवेगळी वाक्ये एकत्र जोडण्यासाठी एखाद्या Subordinating Conjunction चा उपयोग केलेला असतो.
अशा वाक्यातील Subordinating Conjunction ने सुरू होणाऱ्या वाक्याला गौणवाक्य असे म्हणतात, तर दुसऱ्या वाक्याला मुख्यवाक्य असे म्हणतात.
गौणवाक्याला इंग्रजी व्याकरणामध्ये Subordinating Clause (सबॉर्डिनेटिंग् क्लॉज्) असे म्हणतात.
तसेच, मुख्यवाक्याला इंग्रजी व्याकरणामध्ये Main Clause (मेन क्लॉज्) किंवा Principal Clause (प्रिन्सिपल क्लॉज्) असे म्हणतात.
Noun Clause as Subject of Verb ची रचना
Noun Clause as Subject of Verb ची रचना नेहमी एखाद्या Complex Sentence मध्ये वापरलेली असते.
या रचनेचे वैशिष्ट्य असे आहे की या sentence ची सुरूवात एखाद्या Subordinating Conjunction ने केलेली असते.
या रचनेत Main Clause आणि Subordinating Clause हे दोन्हीही Subordinating Conjunction च्या एकाच बाजूला म्हणजेच उजवीकडे येतात.
त्यामुळे Subordinating Clause ची सुरूवात कुठून होते, हे समजणे जरी सोपे असले, तरी त्याचा शेवट कोणत्या शब्दाने होतो हे समजणे कठीण जाते.
तसेच, Main Clause ची सुरूवात कुठून करायची हे सुद्धा समजणे कठीण जाते.
Noun Clause as Subject of Verb कसा ओळखावा?
जेव्हा वाक्याची सुरूवात Subordinating Conjunction ने होते, तेव्हा Subordinating Clause आणि Main Clause ओळखण्यासाठी या वाक्यातील दोन वेगवेगळी verbs शोधून निश्चित करावीत.
दोन्ही verbs निश्चित केल्यानंतर दुसऱ्या Verb पासूनचे वाक्य हे Main Clause म्हणजे मुख्यवाक्य समजावे.
तसेच, Subordinating Conjunction पासून उरलेले वाक्य हे Subordinating Clause म्हणजे गौणवाक्य समजावे.
For example (उदाहरणार्थ),
- Where they have left is unknown to us.
- ते कुठे निघून गेले आहेत, हे आम्हाला माहित नाही.
वरील वाक्यामध्ये वाक्याची सुरूवात where (व्हेअर) या Subordinating Conjunction ने केलेली असून वाक्यामध्ये left आणि is ही दोन verbs वापरलेली आहेत.
तसेच, ‘Where they have left’ हा संपूर्ण शब्दसमूह ‘is’ या verb चा subject म्हणून वापरलेला आहे.
त्यामुळे, या संपूर्ण जोडवाक्याला Complex Sentence असे म्हणतात, तर Subordinating Clause ला Noun Clause as Subject of Verb असे म्हणतात.
या वाक्याचे पृथक्करण पुढीलप्रमाणे करता येते –
-
Main Clause is unknown to us
-
Subordinating Clause Where they have left
- Noun Clause as Subject of Verb ‘is’ in the Main Clause
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- That you should say so surprises me.
-
Main Clause surprises me
-
Subordinating Clause That you should say so
- Noun Clause as Subject of Verb ‘surprises’ in the Main Clause
Example 2
- Whether we can start tomorrow appears uncertain.
-
Main Clause appears uncertain
-
Subordinating Clause Whether we can start tomorrow
- Noun Clause as Subject of Verb ‘appears’ in the Main Clause
Example 3
- What you hide from us makes your case doubtful.
-
Main Clause makes your case doubtful
-
Subordinating Clause What you hide from us
- Noun Clause as Subject of Verb ‘makes’ in the Main Clause
Example 4
- How he could assist his friend was his chief concern.
-
Main Clause was his chief concern
-
Subordinating Clause How he could assist his friend
- Noun Clause as Subject of Verb ‘was’ in the Main Clause
Example 5
- Why he left is a mystery.
-
Main Clause is a mystery
-
Subordinating Clause Why he left
- Noun Clause as Subject of Verb ‘is’ in the Main Clause