Verb म्हणजे काय?
वाक्यातील क्रियादर्शक शब्दाला Verb (व्हर्ब) म्हणजे क्रियापद असे म्हणतात. ते सामान्यतः वाक्याच्या दुसऱ्या स्थानी वापरले जाते.
नियम १
इंग्रजी व्याकरणात वाक्यातील Verb आपल्याला त्या वाक्यातील Subject च्या Action (क्रिया), State (अवस्था) किंवा Possession (मालकी) यांबद्दल माहिती देते.
नियम २
वाक्यातील Verb मुळे वाक्यातील क्रिया ही कोणत्या काळात अर्थात Tense मध्ये झालेली आहे किंवा होत आहे किंवा होणार आहे याचाही अर्थबोध आपल्याला होतो.
इंग्रजी व्याकरणातील Verbs ची विभागणी त्यांच्या Action, State आणि Possession नुसार पुढीलप्रमाणे एकूण तीन प्रकारांमध्ये केलेली आहे.
To चे Verb
To चे Verb (टू चे व्हर्ब) म्हणजे कृतीदर्शक क्रियापद होय.
To च्या Verb मुळे Subject च्या Action विषयी माहिती मिळते.
Read more about To चे VerbTo be चे Verb
To be चे Verb (टू बी चे व्हर्ब) म्हणजे स्थितीदर्शक क्रियापद होय.
To be च्या Verb मुळे Subject च्या State विषयी माहिती मिळते.
Read more about To be चे VerbTo have चे Verb
To have चे Verb (टू हॅव चे व्हर्ब) म्हणजे स्वामित्वदर्शक क्रियापद होय.
To have च्या Verb मुळे Subject च्या Possession विषयी माहिती मिळते.
Read more about To have चे Verb