Coordinating Conjunction
Coordinating Conjunction (कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्) म्हणजे प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय होय.
समान दर्जाचे शब्द किंवा Phrases किंवा Simple Sentence यांना जोडण्यासाठी जे Conjunction वापरले जाते, त्याला Coordinating Conjunction असे म्हणतात.
नियम १
दोन किंवा अधिक वाक्ये एकमेकांना Coordinating Conjunction ने जोडून तयार झालेल्या वाक्याला Compound Sentence (कम्पाउंड सेन्टेन्स) म्हणजेच संयुक्त वाक्य असे म्हणतात.
नियम २
Coordinating Clause
Coordinating Conjunction चा उपयोग पूर्णपणे स्वतंत्र असलेली समान दर्जाची वाक्ये एकमेकांना जोडण्यासाठी केला जातो.
अशा समान दर्जाच्या वाक्याला इंग्रजी व्याकरणामध्ये Coordinating Clause (कोऑर्डिनेटिंग क्लॉज) असे म्हणतात.
Coordinating Clause हे नेहमी स्वतंत्र आणि अर्थपूर्ण वाक्य असते. त्यामुळे त्याला Principal Clause (प्रिन्सिपल् क्लॉज) म्हणजेच मुख्यवाक्य असेही म्हणतात.
For example (उदाहरणार्थ),
- तो हुशार आहे, पण तो धडधाकट नाहीये.
- He is clever but he is not strong.
वरील वाक्यामध्ये He is clever आणि he is not strong या दोन Coordinating Clauses ना जोडण्याचे काम but हे Coordinating Conjunction करत आहे.
Coordinating Conjunctions ची विभागणी पुढीलप्रमाणे एकूण चार मुख्य प्रकारांमध्ये केलेली आहे.
Cumulative Coordinating Conjunction
Cumulative Coordinating Conjunction (क्युम्युलेटिव्ह कोऑर्डिनेटिंग् कंजंक्शन्) म्हणजे संकलनदर्शक प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय होय.
Cumulative Conjunction मध्ये दोन किंवा अधिक वाक्यांचे अर्थ एकमेकांमध्ये समाविष्ट केलेले असतात.
यामध्ये and, both, as well as, not only...but also इत्यादी Conjunctions चा समावेश होतो.
Read more about Cumulative ConjunctionAlternative Coordinating Conjunction
Alternative Coordinating Conjunction (अल्टरनेटिव्ह कोऑर्डिनेटिंग् कंजंक्शन्) म्हणजे पर्यायदर्शक प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय होय.
Alternative Conjunction मध्ये दोन किंवा अधिक वाक्यांचे अर्थ एकमेकांमध्ये समाविष्ट केलेले असतात.
यामध्ये or, either...or, neither...nor इत्यादी Conjunctions चा समावेश होतो.
Read more about Alternative ConjunctionAdversative Coordinating Conjunction
Adversative Coordinating Conjunction (ऍड्व्हर्झेटिव्ह कोऑर्डिनेटिंग् कंजंक्शन्) म्हणजे विरोधदर्शक प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय होय.
Adversative Conjunction मध्ये दोन किंवा अधिक वाक्यांचे अर्थ परस्पर विरोधाभास दर्शवितात.
यामध्ये but, whereas, while, only इत्यादी Conjunctions चा समावेश होतो.
Read more about Adversative ConjunctionIllative Coordinating Conjunction
Illative Coordinating Conjunction (इलेटिव्ह कोऑर्डिनेटिंग् कंजंक्शन्) म्हणजे अनुमानदर्शक प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय होय.
Illative Conjunction मध्ये दोन किंवा अधिक वाक्यांचे अर्थ काहीतरी अनुमान दर्शवितात.
यामध्ये for या Conjunction चा समावेश होतो.