Possessive or Genitive Case


षष्ठी विभक्ती



Possessive Case or Genitive Case

Possessive Case (पझेसिव्ह केस) किंवा Genitive Case (जेनिटिव्ह केस) म्हणजे षष्ठी विभक्ती होय.

इंग्रजी व्याकरणामध्ये Possessive Case चा उपयोग दोन Nouns मधील Relationship (रिलेशनशिप्) म्हणजे संबंध किंवा Ownership (ओनरशिप्) म्हणजे मालकी हक्क दर्शविण्यासाठी केला जातो.

नियम १
Possessive Case चे चिन्ह

एखाद्या Noun ला जेव्हा 's जोडलेले असते, तेव्हा ते नेहमी Possessive Case चे समजावे.

's ला इंग्रजी व्याकरणामध्ये Apostrophe s (ऍपॉस्ट्रॉफी एस्) असे संबोधले जाते.

For example (उदाहरणार्थ),
  • Ram's book (रामचे पुस्तक)
  • Leena's house (लीनाचे घर)
  • Kiran's phone (किरणचा फोन)
नियम २
निर्जीव वस्तूचा संबंध

सामान्यतः कोणत्याही निर्जीव वस्तूला Possessive Case चे 's हे चिन्ह लावले जात नाही.

निर्जीव वस्तूंचा संबंध दर्शविण्यासाठी of या Preposition चा उपयोग केला जातो.

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • the street's lights  वापरू नये.
  • the lights of the street वापरावे.
Example 2
  • the garden's tree  वापरू नये.
  • the tree of the garden वापरावे.
Example 3
  • the chair's hand  वापरू नये.
  • the hand of the chair वापरावे.
नियम ३

मनुष्यप्राण्याव्यतिरिक्त दुसऱ्या एखाद्या सजीव प्राण्याचा संबंध दर्शविण्यासाठी Possessive Case चे 's हे चिन्ह वापरले जाते.

For example (उदाहरणार्थ),
  • a lion's head (सिंहाचे डोके)
  • a bird's feather (पक्ष्याची पिसे)
  • an elephant's trunk (हत्तीची सोंड)
नियम ४

Time (वेळ), Space (जागा), Weight (वजन) आणि Value (मूल्य) यांबाबत वापरलेल्या Nouns चा संबंध दर्शविण्यासाठी Possessive Case चे 's हे चिन्ह वापरले जाते.

For example (उदाहरणार्थ),
  • a week's journey (आठवड्याचा प्रवास)
  • a month's leave (एका महिन्याची रजा)
  • a stick's length (काठीची लांबी)
  • a needle's point (सुईचे टोक)
  • a gram's weight (एक ग्राम वजन)
  • a rupee's worth (एका रूपयाची किंमत)

This article has been first posted on and last updated on by