Compound Preposition “about”
about (अबाउट) हे एक Compound Preposition आहे.
इंग्रजी व्याकरणामध्ये about चा उपयोग Adverb किंवा Preposition यांपैकी एका प्रकारे करता येतो.
Compound Preposition म्हणून वापरताना इंग्रजी व्याकरणामध्ये about चा उपयोग पुढीलपैकी एखादा अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो.
about = विषयी, संबंधी, बद्दल
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- This book is about restaurants in Mumbai.
- हे पुस्तक मुंबईमधील उपहारगृहांबद्दल आहे.
Example 2
- They were talking about their experience in Europe.
- ते त्यांच्या युरोपमधील अनुभवाविषयी बोलत होते.
about = सभोवती (लगत)
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- He was walking about the lake.
- तो तलावालगत चालत होता.
Example 2
- He was taking a stroll about the house.
- तो घरासभोवती फेरफटका मारत होता.
about = सुमारे (अंदाजे)
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- There were about a hundred cakes in the tray.
- तबकामध्ये तलावालगत शंभर केक होते.
Example 2
- It is about 2 o'clock in the morning.
- आता अंदाजे सकाळचे दोन वाजले आहेत.