Compound Preposition “along” आणि “alongside”
along (अलाँग्) किंवा alongside (अलाँगसाईड) हे एक Compound Preposition आहे.
इंग्रजी व्याकरणामध्ये along किंवा alongside चा उपयोग Adverb किंवा Preposition यांपैकी एका प्रकारे करता येतो.
Compound Preposition म्हणून वापरताना इंग्रजी व्याकरणामध्ये along किंवा alongside चा उपयोग पुढील अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो.
along / alongside = बाजूने, कडेने, बाजूला, कडेला, शेजारी
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- We were walking along the road.
- आम्ही रस्त्याच्या कडेने चालत होतो.
Example 2
- There are many shops along the river.
- नदीच्या कडेला अनेक दुकाने आहेत.
Example 3
- They have a house alongside the park.
- उद्यानाच्या शेजारी त्यांचं घर आहे.
along आणि alongside या दोन्हींचा अर्थ जवळजवळ सारखाच आहे.
फरक फक्त इतकाच आहे की बाजूने जाण्याची गती दाखवताना along वापरले जाते. तर, बाजूला किंवा शेजारी असण्याची स्थिती दर्शविण्यासाठी alongside चा उपयोग केला जातो.
त्याचप्रमाणे, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पसरलेला असा उल्लेख करताना along वापरावे तर, एखाद्या विशिष्ट जागेच्या शेजारी असा उल्लेख करताना alongside चा उपयोग करावा.