Compound Preposition “among” आणि “amongst”
among (अमंग) किंवा amongst (अमंग्स्ट) हे एक Compound Preposition आहे.
Compound Preposition म्हणून वापरताना इंग्रजी व्याकरणामध्ये among किंवा amongst चा उपयोग पुढील अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो.
among / amongst = मध्ये ("अनेकांमध्ये" या अर्थाने)
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- There were fighting amongst themselves.
- ते आपआपसांत (एकमेकांमध्ये) भांडत होते.
Example 2
- The money will be divided among four charitable organizations.
- ते पैसे चार धर्मादाय संस्थांमध्ये विभागले जातील.
among आणि amongst या दोन्हींचा अर्थ सारखाच आहे.
amongst हे जुन्या पद्धतीचे Preposition असून आधुनिक इंग्रजीमध्ये त्याचा उपयोग फारसा केला जात नाही.
among आणि between मधील फरक
दोनपेक्षा अधिक वस्तू किंवा व्यक्ती यांच्यामध्ये असा उल्लेख करावयाचा असल्यास among चा उपयोग केला जातो.
मात्र, फक्त दोन वस्तू किंवा दोन व्यक्ती यांच्यामध्ये असा उल्लेख करावयाचा असल्यास नेहमी between चा उपयोग करावा.