Simple Preposition “for”
for (फॉर) हे एक Simple Preposition आहे.
इंग्रजी व्याकरणामध्ये for चा उपयोग पुढीलपैकी एखादा अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो.
for = साठी, करिता (..कारणामुळे)
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- They were punished for creating trouble in the class.
- वर्गात मस्ती केल्यामुळे (मस्ती करण्याच्या कारणामुळे) त्यांना शिक्षा करण्यात आली.
Example 2
- She could not buy the new dress for want of money.
- तिच्याकडे पैसे कमी असल्यामुळे (असण्याच्या कारणामुळे) नवीन कपडे खरेदी करता आले नाहीत.
for = साठी, करिता (उद्देश)
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- Let us go for a walk in the park.
- आपण चालण्यासाठी (चालण्याच्या उद्देशाने) उद्यानात जाऊया.
Example 2
- We have kept that cup for coffee.
- आम्ही तो पेला कॉफीसाठी (कॉफी घेण्याच्या उद्देशाने) ठेवला आहे.
for = साठी, करिता (काहीतरी मिळवण्यासाठी)
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- He reads books for pleasure.
- तो आनंदासाठी (आनंद मिळवण्यासाठी) पुस्तके वाचतो.
Example 2
- They ran the race for the prize.
- ते शर्यतीत बक्षिसासाठी (बक्षीस मिळवण्यासाठी) धावले.
for = साठी, करिता (..च्या दिशेने, स्थलवाचक)
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- This bus leaves for Mumbai at 5 o'clock.
- ही बस मुंबईसाठी (मुंबईच्या दिशेने) पाच वाजता निघते.
Example 2
- My father will leave for Delhi tomorrow.
- माझे बाबा दिल्लीसाठी (दिल्लीच्या दिशेने) उद्या निघतील.
for = च्या बद्दल, च्या ऐवजी
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- I will give you my book for your notebook.
- मी तुला तुझ्या वहीच्या बदल्यात माझं पुस्तक देईन.
Example 2
- She brought a new frock for the old one.
- तिने जुन्या झग्याच्या बदल्यात नवीन झगा आणला.
for = अवधी दर्शविण्यासाठी
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- He was our teacher for two years.
- ते दोन वर्ष आमचे शिक्षक होते.
Example 2
- She is on leave for a whole week.
- ती संपूर्ण आठवडा सुट्टीवर आहे.