Simple Preposition “from”
from (फ्रॉम) हे एक Simple Preposition आहे.
इंग्रजी व्याकरणामध्ये from चा उपयोग पुढीलपैकी एखादा अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो.
from = पासून (जेथून सुरूवात करावयाची तेथून)
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- It is a distance of two miles from my home to school.
- माझ्या घरापासून शाळेपर्यंत दोन मैलांचं अंतर आहे.
Example 2
- I know him from his school days.
- मी त्याला त्याच्या शाळेच्या दिवसांपासून ओळखतो.
from = कडून, वरून
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- He received a gift from his friends.
- त्याला त्याच्या मित्रांकडून एक भेटवस्तू मिळाली.
Example 2
- She was speaking from her past experience.
- ती तिच्या मागील अनुभवावरून बोलत होती.
from = मुळे (कारणामुळे)
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- She is suffering from a severe cold.
- तीव्र सर्दीमुळे ती आजारी आहे.
Example 2
- He did not speak anything from fear.
- भीतीमुळे तो काहीही बोलला नाही.