Simple Preposition “on”
on (ऑन्) हे एक Simple Preposition आहे.
इंग्रजी व्याकरणामध्ये on चा उपयोग Preposition किंवा Adverb अशा दोन्हीही प्रकारे करता येतो.
जेव्हा on ला जोडून त्यानंतर एखादे Noun किंवा Pronoun वापरलेले असते, तेव्हा त्याला Preposition असे म्हणतात.
मात्र, जेव्हा on हे एखाद्या To च्या Verb ला जोडून वापरलेले असते आणि त्याला कोणतेही Noun किंवा Pronoun जोडलेले नसते, तेव्हा त्याचा उपयोग वाक्यामध्ये Adverb म्हणून केलेला असतो.
Simple Preposition म्हणून वापरताना इंग्रजी व्याकरणामध्ये on चा उपयोग पुढीलपैकी एका अर्थाने केला जातो.
on = वर (कोणत्याही पृष्ठभागावर)
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- He kept the book on the table.
- त्याने पुस्तक टेबलावर ठेवले.
Example 2
- You can hang your coat on the wall.
- तुम्ही तुमचा अंगरखा भिंतीवर अडकवू शकता.
on = वर (शरीराच्या कोणत्याही भागावर)
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- He was wearing a hat on his head.
- तो त्याच्या डोक्यावर टोपी घालत होता.
Example 2
- He had a coat on his back.
- त्याच्या पाठीवर अंगरखा होता.
on = दिवशी (कालवाचक)
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- He gets his salary on the first day of the month.
- महिन्याच्या पहिल्या दिवशी त्याला त्याचा पगार मिळतो.
Example 2
- We have a holiday on Sunday.
- रविवारी (रविवारच्या दिवशी) आम्हाला सुट्टी आहे.
on = नंतर (एखाद्या गोष्टीच्या नंतर)
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- I will take a bath on reaching home.
- मी घरी पोहोचल्यावर (पोहोचल्यानंतर) स्नान करेन.
Example 2
- She will be very happy on seeing him.
- त्याला बघून (बघितल्यानंतर) तिला खूप आनंद होईल.
on = विषयी (एखाद्या विषयावर)
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- His lecture on phonetics was very good.
- त्याचे ध्वनिशास्त्रावरचे (ध्वनिशास्त्र या विषयावरचे) व्याख्यान फार चांगले होते.
Example 2
- It is a useful book on botany.
- वनस्पतिशास्त्रावरचे (वनस्पतिशास्त्र या विषयावरचे) हे एक उपयुक्त पुस्तक आहे.
on = बाजूला (स्थलवाचक)
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- He was driving the car on the wrong side.
- तो चुकीच्या बाजूला गाडी चालवत होता.
Example 2
- Many people pray on the Ganges.
- बरेच लोक गंगेवर (गंगा नदीच्या बाजूला) प्रार्थना करतात.
on = साधनाने, इंधनाने, ..च्या जोरावर
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- My car runs on petrol.
- माझी गाडी पेट्रोलवर (पेट्रोल या इंधनाने) चालते.
Example 2
- I can work longer on a cup of tea.
- मी एक कप चहावर (एक कप चहाच्या जोरावर) जास्त वेळ काम करू शकतो.