Simple Preposition “through”
through (थ्रू) हे एक Simple Preposition आहे.
इंग्रजी व्याकरणामध्ये through चा उपयोग Adverb किंवा Preposition यांपैकी एका प्रकारे करता येतो.
Simple Preposition म्हणून वापरताना इंग्रजी व्याकरणामध्ये through चा उपयोग पुढीलपैकी एखादा अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो.
through = मधून, आतून (आरपार)
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- He looked at her through the window.
- त्याने तिच्याकडे खिडकीमधून बघितले.
Example 2
- He was driving his car through the field.
- तो शेतातून (शेतामधून) गाडी चालवत होता.
through = च्या शेवटपर्यंत (एखादी गोष्ट संपेपर्यंत)
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- It was difficult for them to sit through the long lecture.
- एवढ्या दीर्घ काळ चालणाऱ्या व्याख्यानाला (व्याख्यानाच्या शेवटपर्यंत) बसणं त्यांच्यासाठी अवघड होतं.
Example 2
- We enjoyed sitting around bonfire through the night.
- शेकोटीच्या भोवताली बसून आम्ही रात्रभर (रात्र संपेपर्यंत) मजा केली.