Simple Preposition “with”
with (विथ) हे एक Simple Preposition आहे.
इंग्रजी व्याकरणामध्ये with चा उपयोग पुढीलपैकी एखादा अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो.
with = सह, बरोबर (सोबत)
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- He is with his brother.
- तो त्याच्या भावाबरोबर (भावासोबत) आहे.
Example 2
- She works with him.
- ती त्याच्यासह (त्याच्यासोबत) काम करते.
with = ..च्या जवळ, कडे, ..च्या हातात
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- Please leave the keys with my neighbour.
- कृपया चाव्या माझ्या शेजाऱ्याकडे (शेजाऱ्याजवळ) ठेवा.
Example 2
- The decision does not rest with me.
- तो निर्णय माझ्या हातात नाही आहे.
with = संगतीने, बरोबर, सोबत (मागे न पडता)
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- We should change with the times.
- आपण वेळेबरोबर (वेळेच्या मागे न पडता) बदलले पाहिजे.
Example 2
- The prices of vegetables change with the season.
- भाज्यांचे भाव हंगामासोबत बदलतात.
with = ..ने ("सहाय्या"ने या अर्थी)
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- She cut all the vegetables with a knife.
- तिने सर्व भाज्या सुरीने (सुरीच्या सहाय्याने) कापल्या.
Example 2
- He was writing a letter with a pen.
- तो लेखणीने (लेखणीच्या सहाय्याने) एक पत्र लिहित होता.