नियम १
To be चे Verb हे वाक्याच्या दुसऱ्या स्थानी वापरले जाते.
नियम २
To be चे Verb हे नेहमी Intransitive म्हणजे अकर्मक असते.
नियम ३
वाक्यातील उपयोगानुसार या Verb ला एकतर To be चे Verb किंवा Primary Auxiliary Verb यांपैकी एक संज्ञा दिली जाते.
नियम ४
Primary Auxiliary Verb
जेव्हा या Verb ला जोडून एखादे Present Participle किंवा Past Participle वापरले जाते, तेव्हा त्याला Primary Auxiliary Verb असे म्हणतात.
Primary Auxiliary Verb म्हणून जेव्हा ही Verbs वापरली जातात, तेव्हा त्यांचा उपयोग Tense आणि Active Passive Voice या विषयांमध्ये केला जातो.
For example (उदाहरणार्थ),
- I am working.
- मी काम करत आहे.
वरील वाक्यामध्ये am या Verb ला जोडून working हे Present Participle वापरलेले आहे.
या वाक्यात वापरलेले am हे To be चे Verb नसून ते वाक्यातील Present Participle ला सहाय्य करत आहे.
त्यामुळे या वाक्यात am ला Primary Auxiliary Verb समजावे.
नियम ५
To be चे Verb
जेव्हा या Verb ला जोडून एखादे Complement वापरलेले असते, तेव्हा त्याला To be चे Verb असे म्हणतात.
For example (उदाहरणार्थ),
- He is a teacher.
- तो एक शिक्षक आहे.
वरील वाक्यामध्ये is ला जोडून teacher हे Complement वापरलेले आहे.
त्यामुळे या वाक्यात is ला To be चे Verb समजावे.
To be च्या Verbs ची विभागणी त्यांच्या काळानुसार पुढीलप्रमाणे केलेली आहे.
Present Tense
Present Tense (प्रेझेंट टेन्स) चे To be चे Verb म्हणजे वर्तमानकालवाचक स्थितीदर्शक क्रियापद होय.
यामध्ये पुढील To be च्या Verbs चा समावेश होतो –
- am
- is
- are
Past Tense
Past Tense (पास्ट टेन्स) चे To be चे Verb म्हणजे भूतकालवाचक स्थितीदर्शक क्रियापद होय.
यामध्ये पुढील To be च्या Verbs चा समावेश होतो –
- was
- were
Future Tense
Future Tense (फ्यूचर टेन्स) चे To be चे Verb म्हणजे भविष्यकालवाचक स्थितीदर्शक क्रियापद होय.
यामध्ये पुढील To be च्या Verbs चा समावेश होतो –
- shall be
- will be