Modal Auxiliary Verb “must”
must (मस्ट) हे Modal Auxiliary Verb आहे.
गरज, बंधन, कर्तव्य, निश्चय, खात्री आणि अनिवार्यता यांपैकी एखादा भाव व्यक्त करण्यासाठी must चा उपयोग केला जातो.
नियम १
must हे ज्या स्वरुपात दिसते, त्या एकाच स्वरुपात ते वाक्यामध्ये वापरले जाते. To च्या Verb प्रमाणे त्याला रूपे नसतात.
नियम ३
must सोबतचे main verb
must सोबत नेहमी पहिल्या रूपाचे Main Verb वापरले जाते.
must सोबत वापरलेल्या पहिल्या रूपाच्या Main Verb ला खरे पाहता Infinitive असे म्हणतात.
मात्र, हे Infinitive इथे to काढून वापरलेले असल्यामुळे त्याला Plain infinitive (प्लेन इन्फिनिटिव्ह) असेही म्हटले जाते.
जेव्हा आपण must एखाद्या वाक्यात वापरतो, तेव्हा त्या वाक्यातून आपण पुढीलपैकी कोणताही एक भाव व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो.
Necessity and Obligation
Necessity (नेसेसिटी) म्हणजे गरज किंवा Obligation (ऑब्लिगेशन्) म्हणजे बंधन किंवा कर्तव्य यांपैकी एक भाव व्यक्त करण्यासाठी must चा उपयोग केला जातो.
Read more about “must” showing Necessity, ObligationDetermination
Determination (डिटर्मिनेशन्) म्हणजे निश्चय हा भाव व्यक्त करण्यासाठी must चा उपयोग केला जातो.
Read more about “must” showing DeterminationDuty
Duty (ड्युटी) म्हणजे कर्तव्य हा भाव व्यक्त करण्यासाठी must चा उपयोग केला जातो.
Read more about “must” showing DutyCertainty and Inevitability
Certainty (सर्टन्टी) म्हणजे खात्री किंवा Inevitability (इनेव्हिटिबिलिटी) म्हणजे अनिवार्यता यांपैकी एक भाव व्यक्त करण्यासाठी must चा उपयोग केला जातो.
Read more about “must” showing Certainty, Inevitability