Participial Preposition


धातुसाधित शब्दयोगी अव्यय



Participial Preposition – विषय सूची
Participial Preposition म्हणजे काय?

Participial Preposition (पार्टिसिपियल् प्रेपोझिशन) म्हणजे धातुसाधित शब्दयोगी अव्यय होय.

ज्या शब्दाने काही ना काही क्रिया सूचित होते, अशा शब्दाला To चे Verb असे म्हणतात.

अशा क्रियादर्शक शब्दाच्या शेवटी ing प्रत्यय लावून Participial Preposition तयार होते.

एखादा अपवाद वगळता Participial Preposition सामान्यतः To च्या Verb पासून तयार झालेले असते.

Participle आणि Participial Preposition

To च्या Verb ला शेवटी ing प्रत्यय लावून जो नवीन शब्द तयार होतो, त्याचा उपयोग जेव्हा एखाद्या Noun विषयी अधिक माहिती देण्यासाठी केलेला असतो, तेव्हा त्या शब्दाला Present Participle असे म्हणतात.

मात्र, जेव्हा हे Present Participle कोणत्याही Noun बद्दल अधिक माहिती देत नाही, तर ते वाक्यात स्वतंत्रपणे वापरलेले असते, तेव्हा त्याला Participial Preposition असे म्हणतात.

वाक्यात वापरताना एकतर वाक्याची सुरूवात Participial Preposition ने केली जाते किंवा ते वाक्याच्या शेवटी वापरले जाते.

इंग्रजी व्याकरणातील काही Participial Prepositions पुढीलप्रमाणे आहेत.

barring

barring (बारिंग) हे एक Participial Preposition आहे.

barring चा मराठी अर्थ शिवाय, खेरीज किंवा न घडता असा आहे.

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • Barring any sudden incident, this ceremony will be completed.
  • काही अकल्पित घटना न घडता हा समारंभ पूर्ण होईल.
Example 2
  • Barring any accident, the mail will arrive tomorrow.
  • काही अपघात घडल्याशिवाय उद्या टपाल पोहोचेल.

concerning

concerning (कन्सर्निंग) हे एक Participial Preposition आहे.

concerning चा मराठी अर्थ विषयी किंवा संबंधी असा आहे.

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • Concerning yesterday's fire, there are many rumours in the market.
  • कालच्या आगीसंबंधी बाजारात खूप अफवा पसरल्या आहेत.
Example 2
  • Concerning the results in the SSC examination, he is doubtful about his success.
  • शालांत परीक्षेतील त्याच्या निकालाविषयी तो साशंक आहे.

considering

considering (कंसिडरिंग) हे एक Participial Preposition आहे.

considering चा मराठी अर्थ विचारात घेता असा आहे.

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • Considering his marks in every examination, he will not succeed in the final examination.
  • प्रत्येक परीक्षेतील त्याचे गुण विचारात घेता तो वार्षिक परीक्षेत यशस्वी होणार नाही.
Example 2
  • Considering the quality of the product, its price is not high.
  • या वस्तूचा विचारात घेता त्याची किंमत फार नाहीये.

during

during (ड्यूरिंग) हे एक Participial Preposition आहे.

during चा मराठी अर्थ ...च्या वेळी किंवा ...च्या काळात असा आहे.

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • During his imprisonment in the Agra Fort, Shivaji Maharaj did not lose courage.
  • आग्र्याच्या किल्ल्यातील बंदिवासाच्या काळात शिवाजी महाराजांनी धैर्य सोडले नव्हते.
Example 2
  • During India's freedom struggle, many freedom fighters sacrificed their lives.
  • भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या काळात अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या जीवनाचा त्याग केला.

notwithstanding

notwithstanding (नॉटविथस्टँडींग) हे एक Participial Preposition आहे.

notwithstanding चा मराठी अर्थ करूनसुद्धा किंवा असूनसुद्धा असा आहे.

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • Notwithstanding his being rich, he is very humble.
  • श्रीमंत असूनसुद्धा तो अत्यंत विनयशील आहे.
Example 2
  • Notwithstanding their having deadly weapons, they could not vanquish their enemies.
  • त्यांच्याकडे अत्यंत प्राणघातक शस्त्रास्त्रे असूनसुद्धा ते त्यांच्या शत्रूचा पराभव करू शकले नाहीत.

pending

pending (पेंडिंग) हे एक Participial Preposition आहे.

pending चा मराठी अर्थ पर्यंत असा आहे.

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • Pending further orders, Mr Desai will work as the headmaster.
  • पुढील आज्ञापत्र येईपर्यंत श्रीयुत देसाई शिक्षकप्रमुख म्हणून काम करतील.
Example 2
  • Our regiment will not move forward pending the orders of the superiors.
  • वरिष्ठांकडून पुढील सूचना मिळेपर्यंत आमची सैन्याची तुकडी पुढे सरकणार नाही.

regarding

regarding (रिगार्डींग) हे एक Participial Preposition आहे.

regarding चा मराठी अर्थ संबंधी किंवा विषयी असा आहे.

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • Almost all the political parties have accepted the government scheme regarding new reforms.
  • नव्या सुधारणांसंबंधीची सरकारी योजना बहुतेक सगळ्या राजकीय पक्षांनी स्वीकारली आहे.
Example 2
  • I don't know much regarding his financial status.
  • मला त्याच्या आर्थिक परिस्थितीविषयी जास्त माहिती नाही आहे.

This article has been first posted on and last updated on by