Present Participle – विषय सूची
- Present Participle म्हणजे काय?
- Present Participle आणि Gerund मधील फरक
- Continuous Tense मधील Present Participle
- Adjective Phrase मधील Present Participle
- Subject सोबतचे Present Participle
- Object सोबतचे Present Participle
- मराठी वाक्यातील Present Participle
Present Participle म्हणजे काय?
Present Participle (प्रेझेंट पार्टिसिपल्) म्हणजे वर्तमानकालवाचक धातुसाधित होय.
ज्या शब्दाने काही ना काही क्रिया सूचित होते, अशा शब्दाला To चे Verb असे म्हणतात.
अशा क्रियादर्शक शब्दाच्या शेवटी ing प्रत्यय लावून जो नवीन शब्द तयार होतो, त्याला Present Participle असे म्हणतात.
Present Participle आणि Gerund मधील फरक
कोणत्याही To च्या Verb ला शेवटी ing प्रत्यय लावून जो नवीन शब्द तयार होतो त्याला एकतर Present Participle किंवा Gerund यांपैकी एक संज्ञा दिली जाते.
जेव्हा Verb + ing हा शब्द वाक्यातील Transitive Main Verb (ट्रान्झीटिव्ह मेन व्हर्ब) ला जोडून वापरलेला असतो, तेव्हा त्याला Gerund असे म्हणतात.
तसेच, Verb + ing या शब्दाचा संबंध जेव्हा एखाद्या Noun शी जोडलेला असतो, तेव्हा त्या शब्दाला Present Participle असे म्हणतात.
Continuous Tense मधील Present Participle
जेव्हा Verb + ing हा शब्द एखाद्या Continuous Series च्या किंवा Perfect Continuous Series च्या वाक्यामध्ये एखाद्या Auxiliary Verb ला जोडून वापरलेले असते, तेव्हा त्याला Present Participle असे म्हणतात.
For example (उदाहरणार्थ),
- तो नवीन पुस्तक वाचत आहे.
- He is reading a new book.
वरील वाक्यामध्ये is हे Auxiliary Verb वापरलेले असून त्याला जोडून reading हे Present Participle वापरलेले आहे.
to read (वाचणे) या क्रियादर्शक Verb ला ing प्रत्यय लावून reading हे Present Participle तयार झालेले आहे.
Adjective Phrase मधील Present Participle
इंग्रजी व्याकरणामध्ये Present Participle चा उपयोग Adjective म्हणून करता येतो.
वाक्यामध्ये सामान्यतः एखादे Adjective एखाद्या Noun ला जोडून त्याच्या अगोदर वापरले जाते आणि ते Adjective त्या संबंधित Noun विषयी अधिक माहिती देते.
त्याचप्रमाणे, Present Participle सुद्धा एखाद्या Noun ला जोडूनच वापरले जाते. परंतु, हे Adjective कृत्रिम असल्यामुळे ते संबंधित Noun च्या अगोदर न वापरता त्याला जोडून त्याच्यानंतर वापरले जाते.
Present Participle पासून सुरू होणाऱ्या शब्दसमूहाला Adjective Phrase असे म्हणतात.
For example (उदाहरणार्थ),
- नदीत बुडणाऱ्या एका मुलाला त्याने वाचवले.
- He saved the boy drowning in the river.
वरील वाक्यामध्ये boy या noun ला जोडून drowning हे Present Participle वापरलेले आहे.
या वाक्यामध्ये drowning in the river हा संपूर्ण शब्दसमूह एखाद्या Adjective चे काम करत असल्यामुळे त्याला Adjective Phrase असे म्हणतात.
Subject सोबतचे Present Participle
Present Participle ने सुरू झालेली Adjective Phrase ज्या Noun ला जोडलेली असते, ते Noun जर वाक्याचा Subject म्हणून वापरलेले असेल, तर त्या संपूर्ण शब्दसमूहाला वाक्याचा Subject समजावे.
For example (उदाहरणार्थ),
- रस्त्यात क्रिकेट खेळणारी मुले रहदारीला अडथळा करतात.
- The boys playing on the road hinder the traffic.
वरील वाक्यामध्ये boys या noun विषयी अधिक माहिती सांगण्यासाठी playing cricket on the road ही Adjective Phrase वापरलेली आहे.
त्यामुळे The boys playing cricket on the road असा संपूर्ण शब्दसमूह वाक्याचा Subject समजावा.
Object सोबतचे Present Participle
Present Participle ने सुरू झालेली Adjective Phrase ज्या Noun ला जोडलेली असते, ते Noun जर वाक्यातील Main Verb चे Object म्हणून वापरलेले असेल, तर त्या संपूर्ण शब्दसमूहाला वाक्यातील Object समजावे.
For example (उदाहरणार्थ),
- वर्गात गोंगाट करणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षकांनी शिक्षा केली.
- Teacher punished the students making noise in the classroom.
वरील वाक्यामध्ये students या noun विषयी अधिक माहिती सांगण्यासाठी making noise in the classroom ही Adjective Phrase वापरलेली आहे.
तसेच, to punish (शिक्षा करणे) या वाक्यातील main verb ला जोडून हा संपूर्ण शब्दसमूह वापरलेला आहे.
त्यामुळे the students making noise in the classroom असा संपूर्ण शब्दसमूह वाक्यातील main verb चे Object समजावे.
मराठी वाक्यातील Present Participle
- मराठी वाक्यामध्ये Present Participle चा उपयोग करताना अशा वाक्यामध्ये कमीत कमी दोन क्रियापदे वापरलेली असतात.
- या दोन क्रियापदांपैकी अगदी शेवटी वापरलेले क्रियापद हे नेहमी वाक्यातील मुख्य क्रियापद असते. इंग्रजी भाषांतर करताना हे मुख्य क्रियापद वाक्याच्या दुसऱ्या स्थानी वापरले जाते.
- मुख्य क्रियापद वगळता उरलेल्या क्रियापदांचा उपयोग वाक्यामध्ये इतरत्र एखाद्या नामासोबत केलेला असतो आणि त्यांना रा / री / रे / ऱ्या यांपैकी एखादा प्रत्यय जोडलेला असतो.
- मराठी वाक्यातील ज्या क्रियापदाला रा / री / रे / ऱ्या यांपैकी एखादा प्रत्यय जोडलेला असतो, त्याला वाक्यातील Present Participle समजावे.
- कधी कधी हे क्रियापद पोहत असलेले, रांगत असलेली अशा शब्दस्वरूपाचे असते. त्यामुळे अशा शब्दस्वरूपाच्या मराठी वाक्यातील क्रियापदालासुद्धा नेहमी Present Participle समजावे.
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- मी गच्चीवर एक पतंग उडवणारा मुलगा पाहिला.
- I saw a boy flying a kite on the terrace.
Example 2
- पिंजऱ्यात फळे खाणारा पक्षी बंदिवान असतो.
- The bird eating fruits in the cage is a prisoner.
Example 3
- मला आकाशात मुक्तपणे उडणारा पक्षी आवडतो.
- I like a bird flying freely in the sky.
Example 4
- रस्त्यावरून चालणारा माणूस अनोळखी होता.
- The man walking in the street was a stranger.