shall be आणि will be च्या वाक्यातील उपयोगानुसार त्यांना Primary Auxiliary Verb किंवा To be चे Verb यांपैकी एक संज्ञा दिली जाते.
इंग्रजी वाक्याचा Subject हा नेहमी Nominative Case च्या स्वरूपात असतो.
वाक्यातील Subject चे Person लक्षात घेऊन योग्य ते To be चे Verb वापरावे लागते.
Subject च्या Number चा Future Tense च्या To be च्या Verb वर काहीही परिणाम होत नाही.
Person (पुरुष) |
Singular (एकवचन) |
Plural (अनेकवचन) |
---|---|---|
First Person (प्रथम पुरुष) | I shall be (मी असेन) |
We shall be (आम्ही असू) |
Second Person (द्वितीय पुरुष) | You will be (तू असशील) |
You will be (तुम्ही असाल) |
Third Person (तृतीय पुरुष) |
He will be She will be It will be Singular Number Noun + will be |
They will be Plural Number Noun + will be |
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- I shall be late.
- मला उशीर होईल.
Example 2
- Ramesh will be with his mother tomorrow.
- रमेश उद्या त्याच्या आईसोबत असेल.
Example 3
- He will be in Australia tomorrow.
- तो उद्या ऑस्ट्रेलियामध्ये असेल.
Example 4
- Next year they will be in 10th standard.
- पुढील वर्षी ते दहाव्या इयत्तेत असतील.
Example 5
- Mother will be in the kitchen.
- आई स्वयंपाकघरात असेल.