bereave = हिरावून घेणे
इंग्रजी व्याकरणामध्ये bereave (बिरीव्ह) चा उपयोग To चे Verb म्हणून करण्यात येतो.
bereave चा वाक्यामध्ये उपयोग करताना त्याच्यासोबत of हे Preposition वापरले जाते.
bereave ची तीन रूपे
bereaved आणि bereft मधील फरक
एखादी व्यक्ती किंवा वस्तू एखाद्याकडून हिरावून घेतली जाते, तेव्हा ती ज्या कारणामुळे हिरावून घेतली गेलेली आहे, त्यानुसार bereave चे दुसरे आणि तिसरे रूप करावे लागते.
एखादी व्यक्ती मृत्यूमुळे हिरावून घेतली गेली आहे, असा अर्थ जेव्हा करावयाचा असतो, तेव्हा bereaved चा उपयोग दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपात करावा.
मात्र, मृत्यू सोडून इतर कोणत्याही कारणामुळे एखादी वस्तू हिरावून घेतली गेली आहे, असा अर्थ करावयाचा असल्यास नेहमी bereft हे दुसरे आणि तिसरे रूप वापरावे.
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- The electric shock bereft him of consciousness.
- विजेच्या धक्क्याने त्याची शुद्ध हरपली.
- विजेच्या धक्क्याने त्याची शुद्ध हिरावून घेतली. (शब्दशः भाषांतर)
Example 2
- Death bereaved her of her dearest brother.
- मृत्यूने तिच्यापासून तिच्या अत्यंत प्रिय भावाला हिरावून घेतले.