Present Perfect Tense
Present Perfect Tense (प्रेझेंट परफेक्ट टेन्स) म्हणजे पूर्ण वर्तमानकाळ होय.
जेव्हा एखादी क्रिया शंभर टक्के नुकतीच पूर्ण झालेली असते, तेव्हा क्रिया व्यक्त करण्यासाठी Present Perfect Tense चा उपयोग करतात.
नियम १
इंग्रजी वाक्यात Subject नंतर वाक्याच्या दुसऱ्या स्थानी जेव्हा have किंवा has यांपैकी एक Auxiliary Verb वापरलेले असते आणि त्याच्यासोबत एखादे Past Participle वापरलेले असते, तेव्हा त्या वाक्याला Present Perfect Tense चे वाक्य असे म्हणतात.
नियम २
जेव्हा मराठी वाक्याच्या अगदी शेवटी आहे / आहेत / आहोत यांपैकी एखादे क्रियापद वापरलेले असते आणि त्याच्याआधी "ल" च्या बाराखडीतील "भूतकालवाचक धातुसाधित" वापरलेले असते, तेव्हा हे मराठी वाक्य इंग्रजीमध्ये रूपांतरित करताना Present Perfect Tense चा उपयोग करावा लागतो.
For example (उदाहरणार्थ),
- आईने सकाळी न्याहारी बनवली आहे.
- Mother has made breakfast in the morning.
वरील मराठी वाक्यामध्ये आहे हे क्रियापद वापरलेले असून त्याच्याआधी "ल" च्या बाराखडीतील बनवली हे "भूतकालवाचक धातुसाधित" वापरलेले आहे.
त्यामुळे हे वाक्य इंग्रजीमध्ये रूपांतरित करताना Present Perfect Tense चा उपयोग करावा लागतो.
नियम ३
has चा वाक्यातील उपयोग
वाक्याचा Subject म्हणून जर He, She, It यांपैकी एखादे Pronoun (सर्वनाम) किंवा Singular Noun (एकवचनी नाम) वापरलेले असेल, तर त्याला जोडून has हे Auxiliary Verb वापरावे.
For example (उदाहरणार्थ),
- त्याने नवीन चित्रपट पाहिला आहे.
- He has seen the new movie.
वरील वाक्य Present Perfect Tense चे असून वाक्याचा कर्ता म्हणून He हे Pronoun वापरलेले आहे. त्यामुळे, त्याला जोडून has हे Auxiliary Verb वापरलेले आहे.
नियम ४
have चा वाक्यातील उपयोग
वाक्याचा Subject म्हणून जर I, We, You, They यांपैकी एखादे Pronoun किंवा एखादे Plural Noun (अनेकवचनी नाम) वापरलेले असेल, तर त्याला जोडून नेहमी have हे Auxiliary Verb वापरावे.
For example (उदाहरणार्थ),
- त्यांनी त्यांचे काम सुरू केले आहे.
- They have begun their work.
वरील वाक्य Present Perfect Tense चे असून वाक्याचा कर्ता म्हणून They हे Pronoun वापरलेले आहे. त्यामुळे, त्याला जोडून have हे Auxiliary Verb वापरलेले आहे.
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- आम्ही कविता विसरलो आहोत.
- We have forgotten the poem.
Example 2
- एका खोडकर मुलाने खुर्ची मोडली आहे.
- A mischievous boy has broken the chair.
Example 3
- तिने तिची वही तिच्या मैत्रिणीला दिली आहे.
- She has given her notebook to her friend.
Example 4
- केदारने संपूर्ण बाग झाडली आहे.
- Kedar has swept the whole garden.
Example 5
- विद्यार्थ्यांनी त्यांची पुस्तके टेबलावर ठेवली आहेत.
- Students have kept their books on the table.