Compound Preposition “beneath”
beneath (बिनीथ्) हे एक Compound Preposition आहे.
इंग्रजी व्याकरणामध्ये beneath चा उपयोग Adverb किंवा Preposition यांपैकी एका प्रकारे करता येतो.
Compound Preposition म्हणून वापरताना इंग्रजी व्याकरणामध्ये beneath चा उपयोग पुढीलपैकी एक अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो.
beneath = खाली
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- She hid the book beneath the mattress.
- तिने ते पुस्तक गादीखाली लपवले.
Example 2
- A water tap is beneath the kitchen sink.
- स्वयंपाकघरातील बेसिनच्या खाली एक पाण्याचा नळ आहे.
beneath = ..पेक्षा खालच्या दर्जाने (..ला साजेसा नसणारा)
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- He was very happy with his marriage, although some of his relatives thought that he married beneath him.
- जरी त्याच्या काही नातेवाईकांना असे वाटले की त्याने त्याला साजेसे नसणारे लग्न केले आहे, तरी तो त्याच्या लग्नाने खूप आनंदी होता.
Example 2
- You should not treat anyone as if that person is beneath you.
- तुम्ही कोणालाही तो मनुष्य तुमच्यापेक्षा खालच्या दर्जाचा आहे, अशाप्रकारे वागवू नये.