Compound Preposition “beside”
beside (बिसाइड) हे एक Compound Preposition आहे.
Compound Preposition म्हणून वापरताना इंग्रजी व्याकरणामध्ये beside चा उपयोग पुढीलपैकी एक अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो.
beside = जवळ, बाजूला, शेजारी
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- He sat down beside his wife.
- तो त्याच्या बायकोशेजारी (बायकोजवळ) जाऊन बसला.
Example 2
- I always keep a book beside my bed.
- मी नेहमी माझ्या पलंगाशेजारी (पलंगाच्या बाजूला) एखादं पुस्तक ठेवतो.
beside = जोडीला (तुलना केल्यास)
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- My painting looks poor beside yours.
- तुझ्या चित्राच्या जोडीला (चित्राशी तुलना केल्यास) माझे चित्र इतके चांगले दिसत नाही.
Example 2
- She looks beautiful beside him.
- त्याच्या जोडीला ती सुंदर दिसते.