Compound Preposition “toward” किंवा “towards”
toward (टोवर्ड) किंवा towards (टोवर्ड्स) हे एक Compound Preposition आहे.
toward आणि towards या दोन शब्दांमध्ये फक्त एका S या अक्षराचा फरक आहे. मात्र, या दोन्हीही शब्दांचा अर्थ सारखाच आहे.
Compound Preposition म्हणून वापरताना इंग्रजी व्याकरणामध्ये toward किंवा towards चा उपयोग पुढील अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो.
towards = कडे (..च्या दिशेने)
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- The train was coming towards the station.
- गाडी स्थानकाकडे (स्थानकाच्या दिशेने) येत होती.
Example 2
- He turned toward the door.
- तो दरवाज्याकडे (दरवाजाच्या दिशेने) वळला.
towards = एखाद्या विषयासंबंधी
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- What is Government's attitude towards free education?
- मोफत शिक्षणासंबंधी सरकारचा दृष्टीकोन काय आहे?
Example 2
- My feelings have changed toward her.
- तिच्यासंबंधीच्या माझ्या भावना आता बदलल्या आहेत.
towards = ..च्या हेतूने (..च्या दृष्टीने)
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- I have started saving money towards my higher education.
- माझ्या उच्च शिक्षणासाठी (उच्च शिक्षणाच्या हेतूने) मी पैसे साठवायला सुरूवात केली आहे.
Example 2
- Government is working toward eradicating discrimination.
- भेदभाव निर्मूलनाच्या दृष्टीने सरकार काम करत आहे.
towards = जवळ, आसपास (जरा अगोदर)
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- He reached home towards midnight.
- तो मध्यरात्रीच्या आसपास (मध्यरात्रीच्या जरा अगोदर) घरी पोचला.
Example 2
- Account audit is scheduled toward the end of the year.
- खात्यातील आर्थिक व्यवहारांची तपासणी वर्षाखेरीस (वर्ष संपण्याचा जरा अगोदर) नियोजित केलेली आहे.