Simple Preposition “of”
of (ऑफ्) हे एक Simple Preposition आहे.
इंग्रजी व्याकरणामध्ये of चा उपयोग पुढीलपैकी एखादा अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो.
of = ..चा, ..ची, ..चे, ..च्या (मालकीदर्शक)
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- The walls of his house are white.
- त्याच्या घराच्या भिंती पांढऱ्या (पांढऱ्या रंगाच्या) आहेत.
Example 2
- The collection of short stories is very nice.
- तो लघुकथांचा संग्रह खूप चांगला आहे.
of = ..चा (संबंधीचा)
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- This novel is a story of love and romance.
- ही कादंबरी एक प्रेमासंबंधीची रम्यकथा आहे.
Example 2
- I like to watch news of war.
- मला युद्धासंबंधीच्या बातम्या बघायला आवडतात.
of = ..चा (च्या बाजूला)
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- Goa is located to the south of Maharashtra.
- गोवा महाराष्ट्राच्या दक्षिणेच्या बाजूला आहे.
Example 2
- January comes at the beginning of year.
- जानेवारी महिना वर्षाच्या सुरूवातीला येतो.
of = ..चा (च्या नावाचा)
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- India is situated in the Continent of Asia.
- भारत देश आशिया (आशिया नावाच्या) खंडात वसलेला आहे.
Example 2
- The City of Mumbai has better transportation than most other Indian cities.
- इतर भारतीय शहरांपेक्षा मुंबई शहरात (मुंबई नावाच्या शहरात) दळणवळणाच्या चांगल्या सुविधा आहेत.
of = ..चा (पैकी भाग)
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- She drank the whole of milk in the pot.
- पातेल्यामधील दूध तिने संपूर्ण प्यायलं.
Example 2
- He has inherited a half of a million dollars.
- त्याला अर्धा दशलक्ष (दशलक्षाचा अर्धा भाग) डॉलर वारसाहक्काने मिळाले आहेत.