Pronoun म्हणजे काय?
इंग्रजी व्याकरणात कधीकधी एखाद्या वाक्यामध्ये किंवा वाक्यसमूहामध्ये एखाद्या Noun चा वारंवार उपयोग करावा लागतो.
असा वारंवार होणारा उपयोग टाळण्यासाठी त्या Noun ऐवजी ज्या शब्दाचा वापर केला जातो, त्याला Pronoun (प्रोनाऊन) म्हणजेच सर्वनाम असे म्हणतात.
नियम १
Pronoun चा उपयोग एखाद्या Simple Sentence मध्ये वाक्याच्या पहिल्या स्थानी किंवा तिसऱ्या स्थानी केला जातो.
नियम २
इंग्रजी व्याकरणामध्ये प्रत्येक Pronoun चे वर्गीकरण निश्चित आणि कायम स्वरूपाच्या Case (विभक्ती) मध्ये केलेले आहे.
तसेच, प्रत्येक Pronoun चे वर्गीकरण निश्चित आणि कायम स्वरूपाच्या Person (पुरूष) मध्ये सुद्धा केलेले आहे.
नियम ३
Nominative Case चे Pronoun
वाक्यात पहिल्या स्थानी वापरलेले pronoun हे नेहमी Nominative Case चे समजले जाते.
Nominative Case चे pronoun हे वाक्यात फक्त पहिल्या स्थानी Subject म्हणून वापरतात. हे pronoun कधीही तिसऱ्या स्थानी Object म्हणून वापरू नये.
Nominative Case च्या Pronouns ची यादी
Person (पुरुष) |
Number (वचन) |
Pronoun (सर्वनाम) |
---|---|---|
First Person (प्रथम पुरुष) |
Singular | I (मी) |
Plural | We (आम्ही) |
|
Second Person (द्वितीय पुरुष) |
Singular | You (तू) |
Plural | You (तुम्ही) |
|
Third Person (तृतीय पुरुष) |
Singular | He (तो) |
She (ती) |
||
It (तो / ती / ते) |
||
Plural | They (ते / त्या / ती) |
नियम ४
Accusative Case चे Pronoun
वाक्यात तिसऱ्या स्थानी वापरलेले pronoun हे नेहमी Accusative Case चे समजले जाते.
Accusative Case चे pronoun हे वाक्यात फक्त तिसऱ्या स्थानी Object म्हणून वापरतात. हे pronoun कधीही पहिल्या स्थानी Subject म्हणून वापरू नये.
Accusative Case च्या Pronouns ची यादी
Person (पुरुष) |
Number (वचन) |
Pronoun (सर्वनाम) |
---|---|---|
First Person (प्रथम पुरुष) |
Singular | me (मला) |
Plural | us (आम्हाला) |
|
Second Person (द्वितीय पुरुष) |
Singular | you (तुला) |
Plural | you (तुम्हाला) |
|
Third Person (तृतीय पुरुष) |
Singular | him (त्याला) |
her (तिला) |
||
it (त्याला / तिला) |
||
Plural | them (त्यांना) |
नियम ५
Possessive Case चे Pronoun
Possessive Case चे pronoun हे वाक्यात स्वतंत्रपणे न वापरता एखाद्या Noun च्या अगोदर त्याला जोडून वापरतात. त्यामुळे, हे Noun ज्या स्थानी असते, त्या स्थानात या pronoun ला राहावे लागते.
जोपर्यंत हे pronoun स्वतंत्र असते, तोपर्यंत त्याला Possessive Case चे pronoun समजावे.
परंतु, जेव्हा ते एखाद्या Noun ला जोडून वापरले जाते, तेव्हा त्याला Possessive Adjective असे म्हणतात.
Possessive Case च्या Pronouns ची यादी
Person (पुरुष) |
Number (वचन) |
Pronoun (सर्वनाम) |
---|---|---|
First Person (प्रथम पुरुष) |
Singular | my (माझा / माझी / माझे / माझ्या) |
Plural | our (आमचा / आमची / आमचे / आमच्या) |
|
Second Person (द्वितीय पुरुष) |
Singular | your (तुझा / तुझी / तुझे / तुझ्या) |
Plural | your (तुमचा / तुमची / तुमचे / तुमच्या) |
|
Third Person (तृतीय पुरुष) |
Singular | his (त्याचा / त्याची / त्याचे / त्याच्या) |
her (तिचा / तिची / तिचे / तिच्या) |
||
its (त्याचा / त्याची / त्याचे / त्याच्या) (तिचा / तिची / तिचे / तिच्या) |
||
Plural | their (यांचा / त्यांची / त्यांचे / त्यांच्या) |
List of Pronouns
Person | Nominative | Accusative | Possessive | |||
---|---|---|---|---|---|---|
First | I | We | me | us | my | our |
Second | You | You | you | you | your | your |
Third | He | They | him | them | his | their |
She | her | her | ||||
It | it | its |