Past Participle – विषय सूची
- Past Participle म्हणजे काय?
- Perfect Tense मधील Past Participle
- Adjective Phrase मधील Past Participle
- सकर्मक Past Participle
- अकर्मक Past Participle
- मराठी वाक्यातील Past Participle
Past Participle म्हणजे काय?
Past Participle (पास्ट पार्टिसिपल्) म्हणजे भूतकालवाचक धातुसाधित होय.
ज्या शब्दाने काही ना काही क्रिया सूचित होते, अशा शब्दाला To चे Verb असे म्हणतात.
अशा To च्या Verb च्या तिसऱ्या रूपाला Past Participle असे म्हणतात.
Perfect Tense मधील Past Participle
Past Participle चा उपयोग Perfect Series च्या वाक्यामध्ये एखाद्या Auxiliary Verb ला जोडून केलेला असतो.
For example (उदाहरणार्थ),
- तिने तिची वही तिच्या मैत्रिणीला दिली आहे.
- She has given her notebook to her friend.
वरील वाक्यामध्ये has हे Auxiliary Verb वापरलेले असून त्याला जोडून given हे Past Participle वापरलेले आहे.
to give (देणे) या क्रियादर्शक Verb चे तिसरे रूप म्हणजेच given हे Past Participle वाक्यामध्ये वापरलेले आहे.
Adjective Phrase मधील Past Participle
इंग्रजी व्याकरणामध्ये Past Participle चा उपयोग Adjective म्हणून करता येतो.
वाक्यामध्ये सामान्यतः एखादे Adjective एखाद्या Noun ला जोडून त्याच्या अगोदर वापरले जाते आणि ते Adjective त्या संबंधित Noun विषयी अधिक माहिती देते.
त्याचप्रमाणे, Past Participle सुद्धा एखाद्या Noun ला जोडूनच वापरले जाते. परंतु, हे Adjective कृत्रिम असल्यामुळे ते संबंधित Noun च्या अगोदर न वापरता त्याला जोडून त्याच्यानंतर वापरले जाते.
अशा वाक्यामध्ये Past Participle पासून सुरू होणाऱ्या शब्दसमूहाला Adjective Phrase असे म्हणतात.
For example (उदाहरणार्थ),
- एका राजाने १५०० साली बांधलेला एक किल्ला आम्ही पाहिला.
- We saw the fort built by a king in the year 1500.
वरील वाक्यामध्ये fort या noun ला जोडून built हे Past Participle वापरलेले आहे.
या वाक्यामध्ये built by a king हा संपूर्ण शब्दसमूह एखाद्या Adjective चे काम करत असल्यामुळे त्याला Adjective Phrase असे म्हणतात.
सकर्मक Past Participle
Past Participle ज्या To च्या Verb पासून तयार होते, ते जर Transitive (ट्रान्झिटिव्ह) म्हणजे सकर्मक असेल, तर Past Participle चा उपयोग Passive Voice मध्ये केला जातो.
For example (उदाहरणार्थ),
- ब्राँझ हा दोन धातूंपासून बनवलेला मिश्रधातू आहे.
- Bronze is an alloy made from two metals.
वरील वाक्य Passive Voice चे असून alloy या noun ला जोडून made हे Past Participle वापरलेले आहे.
to make (बनवणे) हे एक Transitive To चे Verb असून त्याचे तिसरे रूप म्हणजेच made हे Past Participle वाक्यामध्ये वापरलेले आहे.
Transitive असल्यामुळे या Past Participle चा उपयोग Passive Voice च्या वाक्यामध्ये केला आहे.
अकर्मक Past Participle
Past Participle ज्या To च्या Verb पासून तयार होते, ते जर Intransitive (इंट्रान्झिटिव्ह) म्हणजे अकर्मक असेल, तर Past Participle चा उपयोग Active Voice मध्ये केला जातो.
अशा वाक्यामध्ये Past Participle चा उपयोग संबंधित noun च्या आधी केलेला असतो.
For example (उदाहरणार्थ),
१ | a faded rose | फिका पडलेला गुलाब |
२ | a retired officer | निवृत्त अधिकारी |
३ | a fallen city | (युद्धामध्ये) हरलेले शहर |
४ | a broken heart | तुटलेले हृदय |
५ | a departed person | मृत्यू पावलेला माणूस |
मराठी वाक्यातील Past Participle
- मराठी वाक्यामध्ये Past Participle चा उपयोग करताना अशा वाक्यामध्ये कमीत कमी दोन क्रियापदे वापरलेली असतात.
- या दोन क्रियापदांपैकी अगदी शेवटी वापरलेले क्रियापद हे नेहमी वाक्यातील मुख्य क्रियापद असते. इंग्रजी भाषांतर करताना हे मुख्य क्रियापद वाक्याच्या दुसऱ्या स्थानी वापरले जाते.
- मुख्य क्रियापद वगळता उरलेल्या क्रियापदांचा उपयोग वाक्यामध्ये इतरत्र एखाद्या नामासोबत केलेला असतो आणि त्यांना ला / ली / ले / ल्या यांपैकी एखादा प्रत्यय जोडलेला असतो.
- मराठी वाक्यातील ज्या क्रियापदाला ला / ली / ले / ल्या यांपैकी एखादा प्रत्यय जोडलेला असतो, त्याला वाक्यातील Past Participle समजावे.
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- कावळ्याने बांधलेल्या घरट्यातून एक अंडे जमिनीवर पडले.
- An egg fell to the ground from the nest built by a crow.
Example 2
- टेबलावर ठेवलेला दूरदर्शन संच घरातील सर्व माणसांची करमणूक करतो.
- The television set placed on the table entertains all the people in the family.
Example 3
- नदीपलीकडे बांधलेल्या नवीन इमारतीत बरेच लोक राहतात.
- Several people live in the new building built across the river.
Example 4
- कागदापासून बनवलेला कंदील खूप छान दिसतो.
- The lantern made from paper looks very nice.
Example 5
- एका दानशूर माणसाने बांधलेल्या धर्मशाळेत प्रवासी आश्रय घेतात.
- Travellers seek shelter in the inn built by a philanthropist.