was आणि were च्या वाक्यातील उपयोगानुसार त्यांना Primary Auxiliary Verb किंवा To be चे Verb यांपैकी एक संज्ञा दिली जाते.
इंग्रजी वाक्याचा Subject हा नेहमी Nominative Case च्या स्वरूपात असतो.
वाक्यातील Subject चे Person आणि Number लक्षात घेऊन योग्य ते To be चे Verb वापरावे लागते.
Person (पुरुष) |
Singular (एकवचन) |
Plural (अनेकवचन) |
---|---|---|
First Person (प्रथम पुरुष) | I was (मी होतो) |
We were (आम्ही होतो) |
Second Person (द्वितीय पुरुष) | You were (तू होतास) |
You were (तुम्ही होतात) |
Third Person (तृतीय पुरुष) |
He was She was It was Singular Number Noun + was |
They were Plural Number Noun + were |
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- Yesterday it was Saturday.
- काल शनिवार होता.
Example 2
- Last Monday she was in Mumbai.
- मागच्या सोमवारी ती मुंबईमध्ये होती.
Example 3
- He was an old man.
- तो एक म्हातारा माणूस होता.
Example 4
- Last year they were in 10th standard.
- मागील वर्षी ते दहाव्या इयत्तेत होते.
Example 5
- It was a terrible earthquake.
- तो भूकंप खूप भयानक होता.