am, is आणि are च्या वाक्यातील उपयोगानुसार त्यांना Primary Auxiliary Verb किंवा To be चे Verb यांपैकी एक संज्ञा दिली जाते.
इंग्रजी वाक्याचा Subject हा नेहमी Nominative Case च्या स्वरूपात असतो.
वाक्यातील Subject चे Person आणि Number लक्षात घेऊन योग्य ते To be चे Verb वापरावे लागते.
Person (पुरुष) |
Singular (एकवचन) |
Plural (अनेकवचन) |
---|---|---|
First Person (प्रथम पुरुष) | I am (मी आहे) |
We are (आम्ही आहोत) |
Second Person (द्वितीय पुरुष) | You are (तू आहेस) |
You are (तुम्ही आहात) |
Third Person (तृतीय पुरुष) |
He is She is It is Singular Number Noun + is |
They are Plural Number Noun + are |
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- A dog is a four-legged animal.
- कुत्रा एक चार पायांचा प्राणी आहे.
Example 2
- They are farmers.
- ते शेतकरी आहेत.
Example 3
- I am very tired.
- मी खूप दमलो आहे.
Example 4
- English is a global language.
- इंग्रजी एक जागतिक भाषा आहे.
Example 5
- Physics, Chemistry and Biology are different branches of Science.
- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखा आहेत.