जेव्हा एखाद्या गोष्टीची आपल्याला सवय असते, तेव्हा ती सवय व्यक्त करण्याकरिता used to किंवा accustomed to च्या रचनेचा वापर केला जातो.
ही रचना पुढील स्वरूपात वाक्यामध्ये वापरली जाते.
Subject + To be चे Verb + used to / accustomed to + Noun / Gerund
used to आणि accustomed to या दोन्हीही रचनांचा मराठी अर्थ सवय असणे असाच आहे.
त्यामुळे हा अर्थ व्यक्त करण्याकरिता या दोन्हीपैकी कोणतीही रचना वैकल्पिकरित्या (alternatively) वापरता येते.
used to / accustomed to ला जोडून त्याच्या आधी वाक्याच्या काळानुसार Present Tense / Past Tense / Future Tense चे To be चे Verb वापरलेले असते.
जेव्हा वाक्यातून सवय नसणे असा Negative (नकारार्थी) अर्थ निर्माण करावयाचा असतो, तेव्हा वाक्यातील To be च्या Verb ला not जोडावे.
-
माझ्या लहानपणापासून मला चहाची सवय नाही.
-
I am not used to tea since my childhood.
-
I am not accustomed to tea since my childhood.
-
अनेकांना पहाटे फिरायला जाण्याची सवय असते.
-
Many people are used to taking a walk in the early hours of the morning.
-
Many people are accustomed to taking a walk in the early hours of the morning.
-
बंद खोलीत बसण्याची तिला सवय नव्हती.
-
She was not used to sitting in a closed room.
-
She was not accustomed to sitting in a closed room.